घरक्राइमकापडणीस पिता-पुत्र खूनप्रकरण : सूत्रधाराला आज कोर्टात करणार हजर

कापडणीस पिता-पुत्र खूनप्रकरण : सूत्रधाराला आज कोर्टात करणार हजर

Subscribe

नानावलीतील गाळा पोलिसांनी केला सील

नाशिक : कापडणीस पिता-पुत्राचा खून केल्यानंतर मुख्य सूत्रधार राहुल जगतापने कब्जा केलेला नानावलीतील गाळा नाशिक शहर पोलिसांनी रविवारी (दि.२७) सील केला. याशिवाय, पोलीस कापडणीस खूनप्रकरणातील एकास ताब्यात घेतल्याचे समजते. जगताप याची पोलीस कोठडीतील मुदत संपत असल्याने पोलीस त्याला सोमवारी (दि.२८) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मुक्त विद्यापाठीचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांचा नानावलीत गाळा आहे. राहुल जगतापने त्यांचा खून केल्यानंतर त्यांची प्रॉपर्टी हडपणे सुरू केले. त्याने कापडणीस यांचा नानावलीतील गाळा कब्जा केला होता. या गाळ्यात चप्पलचे दुकान सुरु केले होते. पोलिसांनी राहुल जगताप यास अटक केल्यानंतर त्याने केलेल्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरु केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ४७ लाख रुपये जप्त केले. तर रविवारी नानावलीतील गाळा सील केला.

- Advertisement -

नानासाहेब कापडणीस यांच्या वडनेर गेट व पंडीत कॉलनी येथील घरांची फॉरेन्सिक पथकाने शनिवारी तपासणी केली. त्यात पथकास महत्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. कापडणीस दुहेरी हत्याकांडात राहुल जगतापचा मॅनेजर प्रदीप शिरसाठ आणि त्याचे मित्र विकास हेमके व सूरज मोरे यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यांचा मित्रांच्या मागावर आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -