घरक्राइममोबाईल लोकेशन अन् पोलिसांच्या ‘गूगल’ने अवघ्या काही मिनिटात शोधला बेपत्ता मुलगा

मोबाईल लोकेशन अन् पोलिसांच्या ‘गूगल’ने अवघ्या काही मिनिटात शोधला बेपत्ता मुलगा

Subscribe

नाशिक : बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह मोबाईल लोकेशन आणि गूगल श्वानामुळे सोमवारी (दि.२५)वन विभागाच्या रोपवाटिकेजवळ, गोदावरी नदीपात्रात आढळून आला. मुलाचा पाण्याचा बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनातून समोर आले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आनंद सिद्धार्थ शेजुळे (वय १६, रा. वसुंधरा अपार्टमेंट, डी. के. नगर, गंगापूर रोड, नाशिक) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद दोन दिवसांपूर्वी बेपत्ता होता. याप्रकरणी शेजुळे कुटुंबियांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरु केला होता. आनंद हा नेहमी दोन ते तीन दिवस घराबाहेर राहत असल्याचेही पोलीस तपासात समोर आले होते. तो ज्या दिवशी बेपत्ता झाला, त्या दिवसापासून त्याचा मोबाईल सुदैवाने चालू होता. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून आनंद गोदावरी नदीकाठच्या वनविभागाच्या रोजपावाटिकेचे जवळचे ठिकाण शोधून काढले. मात्र, पोलिसांना घटनास्थळी आनंद दिसला नाही.

- Advertisement -

घटनास्थळी फक्त आनंदची चप्पल आणि मोबाईल दिसून आला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अग्नीशमन दल व श्वान पथकातील गूगल श्वानास पाचारण केले. गूगलने आनंद असलेले ठिकाण दाखवले. त्यानुसार पोलिसांनी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आनंदचा मृतदेह पाण्याबाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालानुसार सांगितले. पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.

आनंद शेजुळे राहत असलेले घर ते नदीपात्राचे अंतर अवघे ५० मीटर आहे. तो वनविभागाच्या रोपवाटिकेच्या परिसरात तीव्र उतार व दाट असलेल्या ठिकाणी गेला. तो घसरून पाण्यात पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नाही. : श्रीकांत निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गंगापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -