घरमहाराष्ट्रनाशिकत्र्यंबकेश्वर मंदिर परिसर मोकळा ठेवावा : जिल्हाधिकार्‍यांची सक्त ताकीद

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर मोकळा ठेवावा : जिल्हाधिकार्‍यांची सक्त ताकीद

Subscribe

त्र्यंबकेश्वरला सेवा-सुविधांचा आढावा

येथे श्रावण महिन्याचा पर्वकाल साधण्यासाठी लाखो भाविकांची हजेरी लागण्याची शक्यता आहे. याबाबत पूर्वनियोजनासाठी नुकतेच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी विविध शासकीय यंत्रणांसह देवस्थान ट्रस्ट, नगरपरिषद यांच्या सेवा-सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर मोकळा ठेवावा, अशा सक्त सुचना देण्यात आल्या.तसेच गर्भगृहात प्रवेश बंद करावा, याबाबत सुचना देताना काही अनास्था व प्रसंग घडल्यास त्याची जबाबदारी देवस्थान ट्रस्ट आणि मुख्याधिकारी यांच्यावर राहील, अशी जिल्हाधिकारी यांनी समज दिली आहे.

बैठकीस ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी देखील सुरक्षेचा आढावा घेतला. काही दिवसांपूर्वी निर्माण झालेली पुरस्थिती पाहता जिल्हाधिकार्‍यांनी समस्यांबाबत विशेष लक्ष घातलेले दिसते. यामुळेच प्रथमच श्रावणाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकार्‍यांनी बैठक घेतली. देवस्थान ट्रस्टने दर्शनबारी मंडपासह सर्व स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश दिले. पेड दर्शन घेणार्‍या भाविकांना उत्तर दरवाजा रथ असलेल्या बाजूने प्रवेश देण्याचे नियोजन करण्याच्या सुचना केल्या आहे.मंदिर परिसर शेवाळला आहे तेथे अपघात घडु शकतात हे निदर्शनास आणले.दर्शनबारीत असलेले बॅरीकेट मधील अंतर कमी आहे. मंदिर परिसरात तातडीने मदत मिळावी म्हणून सुसज्ज रूग्णवहिका तैनात ठेवण्यात येणार आहे. खासगी प्रवासी वाहनांना शहरात प्रवेश बंदी असेल. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. सिंग यांनी पुरोहितांमध्ये स्थानिक पांतस्थ वाद होणार नाही याकडे लक्ष देण्याची सुचना केली.

- Advertisement -

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मुख्याधिकारी प्रवीण निकम यांना शहरातील सर्व पाण्याचे प्रवाह असलेले पात्र स्वच्छ करावेत तसेच पुन्हा पूर्वीसारखी पूरस्थिती निर्माण होऊ नये अशा सुचना दिल्या आहेत.कुशावर्ताच्या पाण्याच्या स्थिती बाबत सर्वच अधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी राज्य सुरक्षा महामंडळाचे कर्मचारी मंदिर सुरक्षेसाठी बोलावणार असल्याचे सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास आहिरे यांनी ब्रम्हगिरी पर्वतावर जाताना मार्गातील जिन्यात स्वयंसेवक ठेवावेत, अशा सुचना दिल्या. फेरी मार्गावर प्रकाशाची आणि टॉयलेट व्यवस्था करावी, अशा सुचना गटविकासधिकारी मधुकर मुरकुटे यांना देण्यात आल्या.

नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर यांनी श्रावणमास यात्रा सुरळीत पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला. प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी आभार व्यक्त केले. बैठकीसाठी तहसीलदार दिपक गिरासे, उपाधिक्षक भिमाशंकर ढोले, उपनगराध्यक्ष कैलास चोथे, गटनेते समीर पाटणकर, नगरसेवक विष्णू दोबाडे, दिपक गिते, शाम गंगापुत्र, नगरसेविका अनिता बागुल, त्रिवेणी तुंगार सोणवणे, आरपीआय तालुकाध्यक्ष शांताराम बागुल, जेष्ठ नेते मधुकराव लांडे, मुख्याधिकारी प्रविण निकम, अभियंता अभिजीत इनामदार,देवस्थान अधिकारी राजाभाऊ जोशी, समीर वैद्य आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -