घरमहाराष्ट्रनाशिकबिबट्याचा हल्ला, दोन वासरांना केले फस्त

बिबट्याचा हल्ला, दोन वासरांना केले फस्त

Subscribe

सातपूर-त्र्यंबक रोडवरील तळेगावातील वस्तीवर आलेल्या बिबट्याने दोन वासरांना फस्त केल्याची घटना गुरुवारी, ९ मे रोजी उघडकीस आली.

सातपूर-त्र्यंबक रोडवरील तळेगावातील वस्तीवर आलेल्या बिबट्याने दोन वासरांना फस्त केल्याची घटना गुरुवारी, ९ मे रोजी उघडकीस आली. यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव वस्तीवरील प्रकाश रघुनाथ पगार यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरांवर बिबट्याने हल्ला केला. गेल्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर रोडवरील मळे व लोकवस्ती भागात बिबट्याचा वावर आहे. भक्ष व पाण्याच्या शोधात बिबट्या लोकवस्तीत येऊ लागल्याने नागरिकांनीही मोठा धसका घेतला आहे. वनविभागाने काही भागांत पिंजरे लावले असले तरीही बिबट्या सापडलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -