घरमुंबईज्योतिष महिलेवर बलात्कार करणाऱ्या सिनेअभिनेतेला न्यायालयीन कोठडी

ज्योतिष महिलेवर बलात्कार करणाऱ्या सिनेअभिनेतेला न्यायालयीन कोठडी

Subscribe

महिलेवर बलात्कार करणारा सिनेअभिनेता करणसिंग भुपेंद्रसिंग ऑबेरॉयला अंधेरीतील लोकल कोर्टाने गुरुवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ज्योतिषी असलेल्या एका ३४ वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या सिनेअभिनेता करणसिंग भुपेंद्रसिंग ऑबेरॉय याला अंधेरीतील लोकल कोर्टाने गुरुवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चार दिवसांपासून तो पोलीस कोठडीत होता, त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला गुरुवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याची पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यातील तक्रारदार महिला ही ३४ वर्षांची असून ती, तिची आई, मावशी आणि तिच्या मुलासोबत सध्या अंधेरी परिसरात राहतात. ज्योतिषी असलेली तक्रारदार तिच्या घरातून काम करते.

काय आहे नेमके प्रकरण?

‘टिंडर’ या डेटींग अ‍ॅपवर ऑगस्ट २०१६ मध्ये तक्रारदार ज्योतिषी महिलेचा करणसिंगशी ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्री आणि नंतर प्रेमात झाले होते. त्यानंतर ते दोघेही सोशल मिडीयावरुन एकमेकांच्या संपर्कात होते. याच दरम्यान त्यांची यमुनानगर परिसरात भेट झाली होती. त्यानंतर तो अधूनमधून तिच्या घरी जात होता. जानेवारी २०१७ मध्ये तो तिच्या घरी असताना त्याने तिला नारळपाणीतून गुंगीचे औषध दिले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. या संबंधाचे त्याने त्याच्या मोबाईलवरुन व्हिडीओ काढले होते. दुसर्‍या दिवशी त्याने तिला घडलेला प्रकार सांगून त्यांच्यातील संबंधाचे व्हिडीओ बनविल्याचे सांगितले. त्यानंतर तिने ते व्हिडीओ डिलीट करण्याची विनंती केली, मात्र तो तिला ब्लॅकमेल करु लागला. व्हिडीओ डिलीट करण्यासाठी तिच्याकडे पैशांसह इतर वस्तूची मागणी करु लागला. सुरुवातीला त्याने तिच्याकडून पोखराज आणि माणिक असे दोन खडे घेतले, हेडफोन, बँकेचे हप्ते भरण्यासाठी पैशांची मागणी करु लागला. त्यानंतर त्याने तिच्याकडून फ्रिज घेतला. नेहमी तो तिच्याकडे काहीतरी वस्तूची मागणी करु लागला होता. मात्र ऑक्टोंबर २०१८ रोजी त्याने तिला तिचे पैसे, सामान परत करणार नाही, व्हिडीओही डिलीट करणार नाही असे सांगून तिला जे काही करायचे आहे ते करावे अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर तिने ओशिवरा पोलिसांत धाव घेऊन तिथे करणसिंगविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. याप्रकरणी बलात्कार, खंडणीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो चार दिवसांपासून पोलीस कोठडीत होता. गुरुवारी त्याला २३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. त्याच्या वतीने लवकरच दिडोंशी सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -