घरमहाराष्ट्रनाशिकनाईक शिक्षण संस्थेत ‘क्रांतिवीर’चा झेंडा

नाईक शिक्षण संस्थेत ‘क्रांतिवीर’चा झेंडा

Subscribe

अध्यक्ष-उपाध्यक्षांसह २७ जागांवर विजयी; प्रगती पॅनलला अवघ्या दोन जागा सत्ताधारी प्रगती पॅनलचा धुव्वा; आव्हाड यांची 25 वर्षांची कारकीर्द संपुष्टात

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या अतिशय चुरशीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या प्रगती पॅनलला पराभवाची धूळ चारत क्रांतिवीर पॅनलने एकहाती विजय मिळवला आहे. अध्यक्षपदाच्या लढतीत कोंडाजी आव्हाड यांचा पराभव करून क्रांतिवीर पॅनलचे पंढरीनाथ थोरे यांनी बाजी मारली. उपाध्यक्ष पदावरही क्रांतिवीरचे अ‍ॅड. पी. आर. गिते यांनी विजयाची मोहर उमटवली. सरचिटणीस पदासाठी रात्री दीड वाजेपर्यंत चाललेल्या मतमोजणीत विद्यमान सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी अवघ्या एक मताने अभिजित दिघोळे यांचा पराभव केला. तसेच सहचिटणीसपदी ‘प्रगती’चे तानाजी जायभावे विजयी झाले. त्यामुळे ‘प्रगती’च्या दोन्ही ‘आप्पां’ना संस्थेत काम करण्याची पुन्हा संधी मिळाली आहे.

संस्थेचे विद्यमान अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांना पराभवाचा धक्का बसल्याने त्यांची गत २५ वर्षातील राजकीय काराकीर्द संपुष्टात आली आहे. तर विरोधी गटाने पुन्हा एकदा संस्थेच्या वर्तुळात प्रवेश केला आहे. व्ही.एन.नाईक संस्थेच्या अध्यक्ष,सरचिटणीस पदासह २९ जागंसाठी झालेल्या निवडणूकीत सत्ताधारी मंडळाच्या ‘प्रगती‘ आणि विरोधकांच्या ‘क्रांतीवीर’पॅनलमध्ये अतिशय चुरशीची लढत  होऊन सभासदांनी सत्ताधाऱ्यांना धक्काच दिला. सुरूवातीला संचालक मंडळांसाठीझालेल्या मतमोजणीचे निकाल बघता ‘क्रांतीवीर’ ने जोरदार मुसंडीमारली. त्यामुळे हा कल पदाधिकाऱ्यांच्या मतमोजणीतही कायम राहतो की काय ? अशी शक्यता वर्तवली जात असतानाच अचानक सहचिटणीस पदावर ‘प्रगती’च्या उमेदवारांनी विजय खेचून आणला. तर सरचिटणीस पदावरही आघाडी मिळविल्याने काही वेळ मतमोजणी केंद्रांबाहेरील वातावरणचा रंग बदलला होता.

- Advertisement -

अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष कोंडाजी आव्हाड आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्यातील लढत पहिल्या फेरीपासून ते शेवटपर्यंत उत्कंठा वाढविणारी ठरली. अखेरीस थोरे यांनी आव्हाडांवर विजय मिळविला.  यापाठाेपाठ उपाध्यक्षपदासाठी विद्यमान पदाधिकारी प्रभाकर धात्रक व क्रांतीवीरचे उमेदवार अॅड. पी. आर. गिते यांच्या लढतीत अॅड.गिते यांनी एकतर्फी विजय मिळविला.

व्ही. एन. नाईक संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठीशनिवारी घेण्यात  आलेल्या मतदान प्रक्रियेत ७९ टक्के मतदान झाले. संस्थेच्या ८ हजार ६९४ सदस्यांपैकी ६ हजार ८४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळाच्याएकूण २९ जागांसाठी शनिवारी (दि. २०) संस्थेच्या कार्यालयातमतदान घेण्यात आले. रविवारी (दि. २१) चोपडा लॉन्स येथेसकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस तब्बल ३९ टेबलवर प्रक्रियेलाप्रारंभ झाला. संचालक मंडळाच्या २५ जागांमध्ये पहिली मतमोजणी महिला गटाच्या दोन जागांसाठी सुरु झाली या मध्ये क्रांतीवीर  पॅनलच्या  शोभा पांडूरंग बोडके यांनी तर दुसऱ्या जागेवर ‘प्रगती’च्या अरूणा प्रविण कराड या ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराडयांच्या स्नुषा विजयी झाल्या आहेत. पाठोपाठ येवला –  मालेगाव जागेसाठी  तुळशिराम  अंबादास  विंचू  व  विजय  दत्तू  सानप  या  दोघांनी  प्रतिस्पर्धी पॅनलच्या उमेदवारांपेक्षा तब्बल साडेतीनशेहून अधिक मतांनी जादा मते घेत पराभूत केले.  तर नांदगाव-बागलाण-कळवणया जांगासाठी जयंत सानप ३६४२ मते व विजय बुरकुल यांनी३४८६ मते मिळाली. या दोन्ही जागांवर  क्रांतीवीरने  विजय मिळविला.

- Advertisement -

दिघोळे,  थोरेंकडून परतफेड

वसंतराव नाईक शिक्षण संस्थेत २०१४ ते २०१९ या कार्यकाळात अध्यक्ष  कोंडाजी आव्हाड व सरचिटणीस हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखालील  पॅनलने  सत्ता  काबीज  केली  होती. त्यांनी  माजी  मंत्री तुकाराम  दिघोळे यांच्या  नेतृत्वाखालील  पॅनलचा  धुव्वा  उडविला होता. प्रगती पॅनलच्या नावाने विद्यमान ९ संचालकांना उमेदवारी नाकारत नव्या चेहऱ्यांना रिंगणात उतरविले  आहे. माजी मंत्री दिघोळेयांनी यांनी अर्ज मागे घेत त्यांचे पुत्र अभिजीत दिघोळे यांना चाल दिल्याने त्यांच्या पॅनलच्या निर्मितीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

संचालक पदांवर विजयी, मिळालेली मते (चौकट)

प्रगती पॅनल विजयी उमेदवार व मते

  • सरचिटणीस-हेमंत धात्रक (3389)
  • सहचिटणीस-तानाजी जायभावे (3519)

क्रांतीवीर पॅनल विजयी उमेदवार व मते

  • अध्यक्ष- पंढरीनाथ थोरे (3892)
  • उपाध्यक्ष- अ‍ॅड. पी. आर. गिते (3855) मते
  • विश्वस्त- भास्कर सोनवणे (3336), दामोदर मानकर (3790), दिंगबर गिते (3804), बाळासाहेब वाघ (3197), सुभाष कराड (3586), अ‍ॅड. अशोक आव्हाड (3323)
  • नाशिक प्रतिनिधी- मंगेश नागरे (3263), विलास आव्हाड (3455), सुरेश घुगे (3273), विष्णू नागरे (3373)
  • निफाड प्रतिनिधी- अशोक नागरे (3578), अ‍ॅड. सुधाकर कराड (3587), विठोबा फडे (3613) मते
  • दिंडोरी प्रतिनिधी- दौलत बोडके (3674), शामराव बोडके (3609), भगवंत चकोर (3350).
  • येवला प्रतिनिधी- तुळशीराम विंचू (3498), विजय सानप (3497)
  • नांदगाव प्रतिनिधी- अ‍ॅड. जंयत सानप (3673), विजय बुरकुल (3518)
  • सिन्नर प्रतिनिधी- रामनाथ बोडके (3417), उत्तम बोडके (3335), अशोक भाबड (3451)
  • महिला प्रतिनिधी- अंजनाबाई काकड (3248), शोभा बोडके (3610)

निवडणुकीची वैशिष्ठ्ये

  • निवडणुकीसाठी एकूण 30 लाख रुपये प्रशासकीय खर्च
  • चॅलेंजिंग मतदानाच्या आधारे अवघ्या एका मताने हेमंत धात्रक विजयी
  • रात्री 3 वाजेपर्यंत चालली मतमोजणी प्रक्रिया
  • पहिल्याच लढतीत अभिजित दिघोळे यांची धात्रक यांना टक्कर
  • 25 वर्षे संस्थेत असलेले कोंडाजी आव्हाड पराभूत
  • पंढरीनाथ थोरे यांच्या सुक्ष्म नियोजनामुळे एकहाती विजय

 -जल्लोष अन पळापळ

दोन्हीही पॅनल्सच्या समर्थकांनी सकाळपासून लॉन्सबाहेर गर्दी केलीहोती ही गर्दी सायंकाळी वाढतच गेली. दुपारी १२ वाजेच्या दरम्यानप्रत्यक्ष मोजणीस सुरूवात झाल्यानंतर पहिल्या पाच जागांवरीलकल हाती येताच लॉन्सबाहेरील समर्थकांची संख्या कमी जास्त होत गेली. दिवसभर संथगतीने सुरू असलेल्या या प्रक्रियेनेसायंकाळनंतर गती घेतली. क्रांतीवीर पॅनलने काही जागांवरआघाडी मिळविल्यानंतर मतदनकेंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंडजल्लोष साजरा केला. यानंतर सहचिटणीस पदावर प्रगतीचे तानाजी जायभावे यांनी सुमारे अडीचशे मतांनी विजय मिळविताच प्रगती पॅनलच्या आशाही पल्लवीत झाल्या. यापाठोपाठसरचिटणीस पदासाठी प्रगती पॅनलचे उमेदवार हेमंत धात्रक यांनी आघाडी घेतली. यानंतर प्रगतीच्या समर्थकांचीही उपस्थिती मतदानकेंद्राबाहेर वाढली. दोन्ही बाजूचे समर्थक बहुसंख्येने एकत्रितआल्याने पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

उत्कंठा आणि हाय व्होल्टेज वातावरण 

सरचिटणीस पदासाठी झालेल्या मतमोजणीमध्ये सुरुवातीला प्रगतीचे हेमंत धात्रक यांनी विजय मिळविला पण  क्रांतीवीरचे अभिजित दिघोळे यांनी हरकत घेत पुन्हा मतमोजणीची मागणी केली. ठराविक चिठ्ठ्या मोजल्यानंतर दिघोळे आणि धात्रक दोघांना समान मते पडली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावेळी काय करायचे याबाबत चर्चा करून चॅलेंजिंग वोट हा पर्याय काढला. यासाठी मतमोजणी करताना तीन मतांवर निर्णय ठरविण्यात आला. यामध्ये पहिले दोन मत उघडताच दोन्ही उमेदवारांचे नावं समोर आले आणि पुन्हा एकदा समान मते अशी परिस्थिती निर्माण झाली. शेवटचे आणि निर्णायक मत हेमंत धात्रक यांच्या बाजूने पडताच प्रगतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

सभासदांसाठी जो जाहीरनामा व वाचननामा दिला आहे तोपाळण्यास कटिबद्ध राहू. सर्वांना विश्वासात घेऊन काम करू. – पंढरीनाथ थोरे,विद्यमान अध्यक्ष 

समाजबांधवांनी दिलेला निर्णय स्वीकारतो. संस्थेच्याहितासाठी काम केले यापुढे काम करत राहणार. हा विजय कामाचा नसून पैशांचा आणि धनशक्तीचा आहे. – कोंडाजी मामा आव्हाड, माजी अध्यक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -