घरमहाराष्ट्र'जय श्रीराम' घोषणेचा आग्रह करत मुस्लिम तरुणाला अज्ञातांकडून मारहाण

‘जय श्रीराम’ घोषणेचा आग्रह करत मुस्लिम तरुणाला अज्ञातांकडून मारहाण

Subscribe

औरंगाबादमध्ये 'जय श्रीराम' घोषणांचा आग्रह करत मुस्लिम तरुणाला अज्ञातांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

देशात मॉब लिंचिगच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी गुरे चोरीच्या संशयावरुन बिहारमध्ये जमावाने तीन जणांची हत्या केली होती. त्याअगोदर मध्य प्रदेशमध्येही तशी घटना घडली होती. दर आठवड्याला मॉब लिंचिगची घटना घडल्याचे समोर येत आहे. मात्र, त्यातून देशातील नागरिक काहीही बोध घेताना दिसत नाहीत. आता तर श्रीराम अशी घोषणा देण्यासाठी दहा ते बारा जणांच्या घोळक्याने एका मुस्लिम तरुणाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. मारहाण करण्यात आलेली व्यक्ती झोमॅटोचा कामगार असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत रिक्षाचालकाचे अपहरण करून जबर मारहाण

- Advertisement -

अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

औरंगाबादमध्ये रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घडली. याअगोदरही शनिवारी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा अशी घटना घडली आहे. सिडको पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -