घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या 'या' कंपनीचे कर्मचारी होणार आता मालक; असे करणारी देशातील पहिली ग्रामीण...

नाशिकच्या ‘या’ कंपनीचे कर्मचारी होणार आता मालक; असे करणारी देशातील पहिली ग्रामीण कंपनी

Subscribe

नाशिक : मोहाडी (जि. नाशिक ) येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे कर्मचार्‍यांसाठी एम्पलॉयी स्टॉक ओनरशिप प्लॅन (ईसॉप) योजना लागू करण्यात आली असून त्यानुसार कर्मचार्‍यांना रू. 70 कोटीचे समभाग (शेअर्स) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रू. 70 कोटी रुपयांच्या कंपनीच्या एकूण देयकाच्या चार टक्के समभाग या योजनेला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.

अल्पभूधारक व छोट्या शेतकर्‍यांच्या मालकीची एकात्मिक मुल्यसाखळी म्हणून ‘सह्याद्री फार्म्स‘ला ओळखले जाते.
सह्याद्री फार्म्स ही ग्रामीण भारतात इसॉप योजनेची घोषणा करणारी पहिली संस्था आहे. या योजनेत ‘सह्याद्री फार्म्स‘च्या वाढीसाठी मूल्य निर्मितीमध्ये योगदान देणार्‍या आमच्या सर्व कर्मचार्‍यांचा समावेश आहे.सर्व भागधारकांसाठी सर्वसमावेशक वाढ आणि मूल्यनिर्मिती हे ‘सह्याद्री फार्म्स‘ ची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. ही संस्था आपल्या सर्व भागधारकांसाठी, प्रामुख्याने शेतकरी भागधारकांसह ग्राहक आणि कर्मचारी यांच्यासाठी मूल्य निर्माण करत आहे.

- Advertisement -

अल्पभूधारक शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनाचा आणि श्रमाचा योग्य मोबदला मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या सह्याद्री फार्म्सने कर्मचार्‍यांच्या हितालाही तितकेच प्राधान्य दिले आहे. ही योजना त्याचाच एक भाग आहे. ‘सह्याद्री फार्म्स’च्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. असे सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी सांगितले.

एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन (ईएसओपी) म्हणजे काय?

  • एक कर्मचारी लाभ योजना जिथे कर्मचाऱ्यांना मुख्यत्वे कंपनीमध्ये स्टॉक शेअर्सच्या स्वरूपात मालकीचे स्वारस्य मिळेल ते कर्मचारी स्टॉक मालकी योजना किंवा ईएसओपी शेअर्स म्हणून ओळखले जाते.
  • ईएसओपी शेअर्स कर्मचाऱ्यांना त्यांच्या योग्य क्षमता प्रदर्शित करण्यास प्रोत्साहित करतात कारण त्यांना माहित आहे की कंपनीचे यश कर्मचाऱ्यांसाठीही फायनान्शियली रिवॉर्डिंग असेल. हे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासाठी मौल्यवान वाटण्यास आणि चांगले रिवॉर्ड मिळविण्यास मदत करते.
  • ईएसओपी हे कर्मचाऱ्यांना मूलभूत वेतनाच्या पलीकडे भरपाई देण्याचा मार्ग आहे. कंपन्या सामान्यपणे वेस्टिंगला टाय प्लॅन पेमेंट करतात, जे कर्मचाऱ्यांना नियोक्ता-प्रदान केलेल्या मालमत्तेला दीर्घकालीन अधिकार देतात. कर्मचारी मालकीच्या इतर आवृत्तींमध्ये थेट खरेदी कार्यक्रम, स्टॉक पर्याय, प्रतिबंधित स्टॉक, पँटम स्टॉक आणि स्टॉकची प्रशंसा यांचा समावेश होतो.
  • ईएसओपी शेअर्सचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे आणि त्यांचे स्वारस्य इतर कंपनी भागधारकांसह संरेखित करणे. व्यवस्थापन दृष्टीकोनातून, ईएसओपी विशिष्ट कर लाभ प्रदान करते आणि कर्मचाऱ्यांना कंपनीच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरणा देते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -