घरताज्या घडामोडीतिसर्‍या लाटेचा धोका निर्माण करण्यास भाजप जबाबदार - नवाब मलिक

तिसर्‍या लाटेचा धोका निर्माण करण्यास भाजप जबाबदार – नवाब मलिक

Subscribe

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ राष्ट्रवादीनेही जन आशीर्वाद यात्रेवरून भाजपवर निशाणा साधला आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, जागतिक आरोग्य संघटनेसह तज्ज्ञांनी गर्दी टाळली नाही तर कोरोनाची तिसरी लाट येईल असा इशारा दिला आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या (Jan Ashirwad yatra) निमित्ताने भाजप गर्दी जमवत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होत असून त्याला भाजप जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शुक्रवारी केला. (Nawab Malik Slam BJP)

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून वर्णी लागलेल्या नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भारती पवार आणि डॉ. भागवत कराड यांनी ठिकठिकाणी जन आशीर्वाद यात्रा काढल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा यात्रांवर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ राष्ट्रवादीनेही जन आशीर्वाद यात्रेवरून भाजपवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजप निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. देशभर यात्रेच्या नावाखाली गर्दी जमवली जात आहे. दुसऱ्या लाटेच्यावेळी निवडणुकीसाठी अफाट गर्दी जमवल्याने हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. याला भाजप कारणीभूत होता ही सत्य परिस्थिती आहे, असे मलिक यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

यात्रेच्या निमित्ताने भाजप गर्दी जमवत आहे. राज्यातही राजकीय कार्यक्रम होत आहेत. या राजकीय कार्यक्रमामुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होत आहे. राज्य सरकारच्या नियमांचे उल्लंघन होत असेल तर निश्चितरुपाने गुन्हा दाखल करुन कारवाई होईल, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

निवडणुका येतील , जातील.परंतु लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत हे भाजपच्या लोकांना कळले पाहिजे, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.


हेही वाचा – तहसीलदार ज्योती देवरेंच्या आरोपांची दखल घ्या, फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -