घरमहाराष्ट्रनक्षलवाद्यांनी केली पोलीस पाटलाची हत्या

नक्षलवाद्यांनी केली पोलीस पाटलाची हत्या

Subscribe

पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांकडून पोलीस पाटलाची हत्या केल्याची घटना उडकीस आली. या घटनेमुळे गावातील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्याची घटना वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे स्थानिकांमध्ये भितीचे वतावरण आहे. एटापल्ली तालुका मुख्यालयापासून १५ कि.मी. अंतरावर एका पोलिस पाटलाची हत्या करण्यात आली. नारानुर येथील पोलीस पाटील मोद्दी पकरी गावडे (वय ५० वर्ष) याचे पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून १५ ते २० नक्षलांनी त्याच्या घरी जाऊन हत्या केली.

गावा जवळच घडली घटना

गावापासून १ किमी अंतरावर ही घटना घडली. पोलीस पाटलाला गावाबाहेर नेवून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यापूर्वी छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात दबा धरून बसलेल्या नक्षलांनी उपपोलीस निरीक्षकासह दोन पोलीस जवानांना ठार मारले होते. त्यात एक दूरदर्शन वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला सुद्धा आपला जीव गमवावा लागला होता. तसेच त्या घटनेत दोन पोलीस जवान गंभीर असून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याची घटना ताजी असतांना गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्याच दिवशी नक्षलांनी पुन्हा तांडव सुरु केल्याचे समजून येत आहे. पोलीस पाटील मोद्दी यांच्या मृत्यू पश्चात त्याला पत्नी, तीन मुलं व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. नक्षलांकडून सतत निष्पाप व्यक्तींना ठार मारल्या जात असल्यामुळे ग्रामीण भागात नक्षल्यावर संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -