घरताज्या घडामोडीDrug Case: आर्यन खान प्रकरणात एनसीबीचा मोठा निर्णय, केवळ ३ प्रकरणांवरच SIT...

Drug Case: आर्यन खान प्रकरणात एनसीबीचा मोठा निर्णय, केवळ ३ प्रकरणांवरच SIT करणार चौकशी

Subscribe

क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो एनसीबीकडून सुरु आहे. एनसीबीकडे एकूण ६ प्रकरणांचा तपास देण्यात आला होता परंतु आता केवळ ३ प्रकरणांवर चौकशी करण्याचे ठरवण्यात आले आहे. यामुळे आता एनसीबी आर्यन खान, समीर खान आणि अरमान कोहली या ड्रग्ज प्रकरणावर चौकशी करणार आहे. एनसीबीची एसआयटी टीमचे नेतृत्व आयजी रँकचा अधिकारी करत आहे. आर्यन खान प्रकरणाचा तपास एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे.

कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी करत ड्रग्ज पार्टीवर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी कारवाई केली होती. या कारवाईमध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. वानखेडेंच्या कारवाईवर राजकीय वर्तुळातून अनेक आरोप करण्यात आले. तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान प्रकरणावरुन पण वानखेडेंवर आरोप करण्यात आले आहेत. अखेर एनसीबीकडून एसआयटी टीम नेमून चौकशी सुरु करण्यात आली आहे. एसआयटीकडे ६ प्रकरणांचा तपास देण्यात आला होता. परंतु हाय प्रोफाईल केसचा तपास जलद होण्यासाठी विशेष पथकाकडून (SIT) 3 प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला आहे.

- Advertisement -

एनसीबीच्या एसआयटीने आर्यन खान प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खानविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. उर्वरित ३ प्रकरणे किरकोळ आहेत. त्या प्रकरणांमध्ये कोणीही हाय प्रोफाईल व्यक्ती नाही.

एनसीबी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एसआयटी ३ हायप्रोफाईल प्रकरणांची चौकशी करेल. ६ प्रकरणापैकी ३ प्रकरणांचा तपास सुरु ठेवण्यात येणार आहे. मुंब्रा, जोगेश्वरी आणि नागपाडा या भागातील ड्रग्ज पेडलर्सच्या केस होत्या.

- Advertisement -

समीर खान प्रकरणात एसआयटीने करण सजनानीचा जबाब नोंदवला आहे. करण सजनानी आणि समीर खान यांना जानेवारीमध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तसेच आर्यन खान जामिनावर असून त्याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच समीर खानची चौकशी करण्यासाठी एसआयटी लवकरच समन्स बजावणार आहे.


हेही वाचा :  Amravati Violence : अस्वस्थता हेच हिंसाचाराच्या… पवारांचे भाजपवर टीकास्त्र


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -