घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात सिटीबस चालकासह वाहकास मारहाण

नाशकात सिटीबस चालकासह वाहकास मारहाण

Subscribe

सिटीलिंक बसचालक आणि वाहकाला मारहाण केल्याची घटना म्हसरुळ बोरगड परिसरात शनिवारी घडली.

नाशिक:चारचाकी वाहनाला धक्का लागल्याची कुरापत काढून महिलेसह चौघांनी सिटीलिंक बसचालक आणि वाहकाला मारहाण केल्याची घटना म्हसरुळ बोरगड परिसरात शनिवारी (दि.१३) घडली. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. शिवाय, मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित चार संशयितांना अटक केली आहे. या घटनेबाबत गोकुळ काकड यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ काकड हे सिटीलिंक बसवर चालक म्हणून कार्यरत आहेत. ते बस (एमएच १५-जीव्ही ७८७०) घेऊन नाशिकरोडवरुन बोरगड येथील कांसारा माता चौकात आले. त्यावेळी बससमोर कार (एमएच-०२, ईआर-९४८५) उभी असल्याने ती बाजूला घ्या, धक्का लागेल, असे त्यांनी सांगितले.
कारमधील संशयित आदित्य चौधरी, मयूर वाघ, रमेश जाधव, प्रशांत गांगुर्डे यांना राग अनावर झाला. त्यानंतर महिलेसह चौघांनी चालक काकड व वाहक अक्षय गवारे यांना मारहाण केली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक वाघ करत आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -