घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेतून जितेंद्र आव्हाड वजा!

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेतून जितेंद्र आव्हाड वजा!

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जुन्नरमधल्या शिवनेरी किल्ल्यापासून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली असून खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे या यात्रेचा प्रमुख चेहरा आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने गाजावाजा करत शिवस्वराज्य यात्रेचा संकल्प सोडला. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि खासदार उदयनराजे भोसले यांचा चेहरा वापरून तरूणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचा आहे. मात्र, या शिवस्वराज्य यात्रेतून पक्षाचे कट्टर पुरोगामी नेते जितेंद्र आव्हाड यांना लांब ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ‘आपलं महानगर’च्या फेसबुक लाईव्हमध्ये ‘पक्षाने माझा कधी वापरच केला नसल्याची’ खंत आव्हाड यांनी बोलून दाखवली होती. आव्हाड यांची खंत खरी असल्याचे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले आहे.

कार्यकर्त्यांची अपेक्षा ठरली फोल

शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या दिवशी शिवनेरी गडावर डॉ. अमोल कोल्हे आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. तर त्यानंतर झालेल्या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, फौजिया खान उपस्थित होत्या. मात्र या सर्वांमध्ये राष्ट्रवादीचा पुरोगामी चेहरा मात्र कुठेही दिसला नाही. पक्षाच्या आऊटगोईंगवर जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत जहाल टीका केली होती. सामान्य कार्यकर्त्याला ही टीका चांगलीच भावली होती. शिवस्वराज्य यात्रेतून देखील त्यांचा हा झंझावात पाहायला मिळेल, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, पहिल्या दिवशी ते या यात्रेतून वजा झाल्याचे दिसले.

- Advertisement -

पाहा विशेष क्षणचित्रे – शिवस्वराज्य यात्रेचा शिवनेरी वरून प्रारंभ

पहिल्या दिवशी उदयनराजे यांची दांडी

शिवस्वराज्य यात्रेत रील लाईफमधील छत्रपती डॉ. अमोल कोल्हे आणि रिअल लाईफमधील छत्रपती उदयनराजे भोसले यांची उपस्थिती असेल, असे सांगितले जात होते. मात्र, आज पहिल्याच दिवशी उदयनराजेंनी दांडी मारल्याचे दिसून आले. उदयनराजे हे संसदेच्या अधिवेशनात व्यस्त असून ते लवकरच यात्रेत सहभागी होतील, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -