घरमहाराष्ट्रमुंबई – नाशिक मार्गाचा रस्ता खचला; महिनाभर वाहतूक बंद

मुंबई – नाशिक मार्गाचा रस्ता खचला; महिनाभर वाहतूक बंद

Subscribe

मुंबई – नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील रस्ता खचल्यामुळे मुंबई – नाशिक मार्ग महिनाभर बंद करण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा फटका हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील बसत आहे. मुंबई – नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील रस्ता खचला आहे. तसेच रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. किमान महिनाभर या रस्त्यावरील वाहूक बंद राहण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – पावसाने गोव्याला झोडपले; अतिवृष्टीचा इशारा

- Advertisement -

काही दिवसांपासून मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह राज्यातील बहुतांश भागात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सलग चार – पाच दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे रेल्वे आणि रस्तेमार्गाने प्रवास करणाऱ्यांचे खूप हाल झाले आहेत. असाच फटका मुंबई – नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला बसला आहे. मुंबई – नाशिक महामार्गावरील कसारा घाटात पुन्हा एकदा रस्ता खचला असून रस्त्यावर काही मीटरपर्यंत मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला असून किमान महिनाभर या मार्गावरील वाहतूक बंद राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.


हेही वाचा – कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ; पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -