घरमहाराष्ट्रदिवसभरातील दौरे रद्द? राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण, म्हणाले...

दिवसभरातील दौरे रद्द? राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण, म्हणाले…

Subscribe

येत्या काही दिवसात मोठा राजकीय भूकंप घडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय.

अजित पवार हे सध्या राज्याच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरत आहे. अजित पवारांच्या एक भूमिकेत राज्यातलं राजकारणच बदलून टाकण्याची ताकद आहे. त्यामुळेच अजित पवार भाजपासोबत जाणार की काय या चर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय. अजित पवारांबाबत दररोज नवी नवीन माहिती समोर येत असून राजकीय घडामोडींनाही आता वेग आलाय. अनेक नेते तर दिल्लीत अमित शाहांच्या भेटीसाठी दाखल झाले असून येत्या काही दिवसात मोठा राजकीय भूकंप घडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय.

खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजीत कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. 18 एप्रिल 2023 रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमीत कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्यापूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी.

- Advertisement -

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ८ एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचा दावा करण्यात येत आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या ३५ ते ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपमध्ये जाणार या चर्चांना उधाण आलेलं असताना आणखी मोठी बातमी समोर आली. अजित पवार उद्या काही आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली. अजित पवारांच्या भाजपमध्ये येण्याच्या चर्चांवर आता त्यांच्या कार्यालयाकडूनच स्पष्टीकरण देण्यात आलंय.

“खारघर येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजीत कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे. उद्या १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमीत कामकाज सुरु राहणार आहे. तसंच मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्यापूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी.”, असं निवेदनच अजित पवार यांच्या कार्यालयातून देण्यात आलं आहे.

- Advertisement -

तसंच आमदार सुनील भुसारा यांनी सुद्दा यावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. “अजित पवार उद्या बैठक बोलावणार ही अफवा आहे. उद्या अजित पवार यांची कुठलीही बैठक नाही. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमात येणाऱ्या अजित पवारांच्या बैठकीबाबतच्या बातम्या या केवळ अफवा आहेत.”, असं आमदार सुनील भुसारा यांनी म्हटलंय. तसंच वज्रमूठ सभेच्या निमित्ताने आम्ही सगळे नेते रात्री १० वाजेपर्यंत एकत्र होतो. या अफवावर विश्वास ठेवू नये. ते दिल्लीला गेले नाहीत. कुणाची भेटही घेतली नाही, असं देखील आमदार भुसारा यांनी म्हटलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -