घरमहाराष्ट्रत्यापेक्षा दुष्काळी भागावर लक्ष दयावे - छगन भुजबळ

त्यापेक्षा दुष्काळी भागावर लक्ष दयावे – छगन भुजबळ

Subscribe

राज्यात दुष्काळी परिस्थिती मोठ्या प्रमाणावर वाढली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र त्यावर काहीही कारवाई करत नाहीत अशा प्रकारची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी केली आहे.

‘जे भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेत त्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. दुष्काळामुळे लोक वैतागून गेले आहेत. जवळपास ८५ लाख लोक दुष्काळामध्ये सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. महिला शेतकरीसुद्धा स्वत:चे सरण रचून आत्महत्या करत आहेत. त्यामुळे सरकारने आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा दुष्काळी भागावर लक्ष दयावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी सरकारला दिला आहे. नियम २९३ अन्वये आमदार छगन भुजबळ यांनी दुष्काळावर बोलताना सरकारवर जोरदार टीका केली. ‘आमच्या सरकारच्या काळात दुष्काळावर काम झाले नाही म्हणून दुष्काळ वाढला, असे म्हणण्यापेक्षा सरकारने आधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करावे’, असे छगन भुजबळ म्हणाले.

‘प्रशासनाने सांगूनही दुष्काळ जाहीर नाही!’

‘शेतकऱ्यांच्या मालाला पैसे नाहीत. शेतकरी माल फेकून देत आहेत. यंत्रणा काय करते आहे असा प्रश्न पडतोय’, अशी शंकाही आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. ‘राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्याला उशीर केला आणि त्यातून अनेक तालुके वगळले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका मराठवाडयाला बसला आहे,’ असेही आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले. तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी दुष्काळ असल्याचे लिहून पाठवत आहेत. परंतु सरकार या दुष्कळाची दखल घेत नाही. जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर जे रिपोर्ट येतात त्यातून दुष्काळ जाहीर करायला हवा होता, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.

- Advertisement -

तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात का? – अजित पवार-गिरीष बापटांमध्ये विधानभवनात काय झाली चर्चा?

‘रोहित्र बसवण्यासाठी अधिकारी पैसे मागतात’

लासलगाव येथे शेतकऱ्यांची वीज कापून नेली जात आहे. दुष्काळामुळे लोक वैतागून गेले आहे. रोहित्र बसवण्यासाठी अधिकारी पैसे मागत आहेत, असा खळबळजनक आरोप छगन भुजबळ यांनी केला. राज्यात पाण्याची टंचाई वाढली आहे. महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्राला मिळायला हवे. गुजरातकडे जाणारे पाणी अडवा. दमणगंगा, नारपार अशा योजनांचा डीपीआर जाहीर करायला हवा. मंत्र्यांवर काही दबाव असेल तर मंत्र्यांनी तो दबाव डावलून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून यावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -