घरमहाराष्ट्रअश्लिल फोटो काढणाऱ्या तरुणाची हत्या

अश्लिल फोटो काढणाऱ्या तरुणाची हत्या

Subscribe

वसई येथे अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो काढणाऱ्या तरुणाची मुलीच्या पित्याने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो काढणाऱ्या तरुणाची मुलीच्या पित्याने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलीचे अश्लिल फोटो काढल्याच्या रागातून मुलीच्या पित्याने दीड महिन्यापूर्वी सुहास धोंडे (३८) या तरुणाची हत्या केली होती. याप्रकरणी हत्ये प्रकरणी आरिफ काझी (४२) आणि अंकुश साने (४५) या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

वसई कोळीवाड्यात आरिफ काझी राहत आहेत. यांच्या मुलीचे मृत सुहास धोंडे यांनी अश्लिल फोटो काढले होते. या रागातून मुलीचे वडील आरिफ काझी यांनी सुहास याचा काटा काढायचे ठरवले. १६ ऑक्टोबर रोजी आरिफने सुहास याला अंकुश याच्या मदतीने झोपेच्या गोळ्या देऊन त्याला बेशुद्ध केले आणि आपल्या गाडीतून मनोरच्या जंगलात नेले. तेथे त्याची कुऱ्हाडीच्या सहाय्याने हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका खड्ड्यात टाकण्यात आला.

- Advertisement -

वाचा – बाखराबाद सामूहिक हत्याकांडातील तीन आरोपींना दुहेरी फाशी


असा लागला शोध

मृत सुहास धोंडे १६ ऑक्टोबर पासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह मनोरच्या जंगलात आढळला होता. या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली असल्या कारणाने हा मृतदेह कोणाचा हे ओळखणे कठीण झाले होते. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होता. मात्र, मयतची ओळख पटत नसल्याने या प्रकरणाचा तपास लांबला होता. वसईच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मृत तरुणाचे फोटो सर्व ठिकाणी लावले होते. ते फोटो मृत सुहास धोंडे यांच्या एका नातेवाईकाने ओळखले. त्याची ओळख पटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचोरे यांच्या पथकाने तपासाची सुत्रे वेगाने हलवली. मृत सुहास धोंडे यांच्या मोबाईलवरुन त्यांच्या संपर्कात असलेली माणसांची चौकशी सुरु केली. या तपासानंतर पोलिसांनी आरिफ काझी आणि विक्रमगड या आरोपींना अटक केली आहे.

- Advertisement -

वाचा – धर्म प्रचारामुळेच त्या अमेरिकी पर्यटकाची हत्या ?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -