घरताज्या घडामोडीNawab Malik : किरीट सोमय्या म्हणजे भाजपच्या आयटम गर्ल, नवाब मलिकांची बोचरी...

Nawab Malik : किरीट सोमय्या म्हणजे भाजपच्या आयटम गर्ल, नवाब मलिकांची बोचरी टीका

Subscribe

समीर वानखेडे यांनी अंमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाई बोगस असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. याविरोधात त्यांनी अनेक फोटो आणि व्हिडीओसुद्धा सादर केले होते.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या राजकीय क्षेत्रातील भाजपची आयटम गर्ल आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. अनेक नेत्यांविरोधात सोमय्यांनी यंत्रणांच्या चौकशीचा ससेमीरा लावला आहे. सध्या सोमय्यांचा मंत्रालयातील एक फोटो व्हायरल होत आहे. सोमय्या मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून फाईलींची छाननी करत असल्याचा हा फोटो आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. पंरतु नवाब मलिकांनी सोमय्यांना आयटम गर्ल म्हणून संबोधल्याने राजकीय वातवारण चांगलेच तापलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक नांदेड दौऱ्यावर आहेत. नांदेडमध्ये मलिकांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी नवाब मलिक म्हणाले की, एखादा चित्रपट चांगला चालावा यासाठी एक आयटम गर्लची आवश्यकता असते. किरीट सोमय्या राजकीय क्षेत्रातील भाजपचे आयटम गर्ल प्रमाणे आहेत. बातमी कशी होईल यासाठी आयटम गर्लचा कार्यक्रम सुरु आहे. अशी बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

- Advertisement -

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. शासकीय कागदपत्रे दाखवत सोमय्यांकडून आरोपांची मालिका सुरुच आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही सोमय्यांनी अनके आरोप केले आहेत. किरीट सोमय्यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जशास तसे उत्तर देण्याचे काम सुरु असून नवाब मलिकांनी यावेळी बोचरी टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन भाजप नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. समीर वानखेडे यांनी अंमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाई बोगस असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. याविरोधात त्यांनी अनेक फोटो आणि व्हिडीओसुद्धा सादर केले होते.

- Advertisement -

हेही वाचा : गोव्यात अन् उत्तर प्रदेशात शिवसेना धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक लढणार, संजय राऊतांची माहिती

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -