घरमहाराष्ट्रRepublic Day 2022 : महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर

Republic Day 2022 : महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर

Subscribe

राष्ट्रपती पदक व अग्निशमन सेवा पदक विजेत्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला दोन राष्ट्रपती सेवा पदकांसह एकूण सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत. प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत केंद्रीय गृह मंत्रालयाने आज उल्लेखनीय सेवेसाठी देशातील अग्निशमन सेवेच्या एकूण 42 अधिकारी -कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये ‘अग्निशम सेवा पदक’ जाहीर केली आहेत. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

बाळू देशमुख यांना मरणोत्तर ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’

अग्निशमन रक्षक बाळू देशमुख यांना सर्वोच्च शौर्यासाठी मराणोत्तर ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. तर मुख्य अग्निशमन  अधिकारी  प्रशांत रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे.+

- Advertisement -

 राज्याला पाच ‘अग्निशमन सेवा पदक’

उत्कृष्ट सेवेसाठी  राज्यातील पाच अधिकारी कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत. यात मुख्य अग्निशमन अधिकारी  किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, अग्रणी अग्निशमक सुरेश पाटील आणि संजय म्हमूनकर तसेच  अग्निशमक चंद्रकांत आनंददास यांचा समावेश आहे.

देशभरातील अग्निशमन अधिकारी कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या अग्निशमन सेवा पदकांमध्ये एक ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’, शौर्यासाठी दोन ‘अग्निशमन सेवा पदक’, विशिष्ट सेवेसाठी नऊ ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’  आणि  उत्कृष्ट सेवेसाठी  30 ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत.

- Advertisement -

राष्ट्रपती पदक व अग्निशमन सेवा पदक विजेत्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या 42 अग्निशमन सेवा पदकांपैकी महाराष्ट्राला सात पदकं मिळाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अग्निशमन पदक विजेत्यांचे तसेच राज्यातील सर्व अग्निशमन अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्याबद्दल अभिनंदन केले आहे. सर्वोत्कृष्ट अग्निशमन सेवेसाठीचे ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ अग्निशमन रक्षक बाळु देशमुख यांना मरणोत्तर आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना जाहीर झाल्याबद्दल, उपमुख्यमंत्र्यांनी प्रशांत रणपिसे यांचे तसेच बाळु देशमुख यांच्या कुटुंबियांचे विशेष अभिनंदन केले आहे. उत्कृष्ट सेवेसाठी ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झालेले मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, अग्रणी अग्निशमक सुरेश पाटील, संजय महामूनकर, अग्निशमक चंद्रकांत आनंददास यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -