घरमहाराष्ट्रसंविधानात ‘जनराज्यपाल’ असा उल्लेख नाही; शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र

संविधानात ‘जनराज्यपाल’ असा उल्लेख नाही; शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र

Subscribe

महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेलं ‘जनराज्यपाल – भगतसिंह कोश्यारी’ हे चित्ररुप कॉफी टेबल पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खरमरीत पत्र लिहित टोला लगावला आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेलं ‘जनराज्यपाल – भगतसिंह कोश्यारी’ हे चित्ररुप कॉफी टेबल पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कॉफी टेबल पुस्तकाची एक प्रत शरदपवार यांना पाठवली. या पुस्तकाचा अभिप्राय देताना शरद पवार यांनी खरमरीत पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या सुरुवातीलाच पवारांनी पुस्तकाच्या शिर्षकावरुनच टोला लगावला आहे.

काय लिहिलं आहे पत्रात?

“महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित ‘जनराज्यपाल – भगतसिंह कोश्यारी’ हे चित्ररुप कॉफी टेबल बुक प्राप्त झालं. वास्तविक भारतीय संविधानात ‘जनराज्यपाल’ असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्यावतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्व प्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद,”असा खोचक उत्तर दिलं आहे.

- Advertisement -

“आपल्या मर्यादित कालावधीतील एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी, स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ यांसारखे सोहळे, उच्चपदस्थ अभ्यागतांच्या-मान्यवरांच्या भेटीगाठी, इतर सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम वर त्यातील आपल्या सहभागाची छायाचित्रे पाहण्यात आली. तसेच निधर्मवादा संदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही,”असा टोला देखील शरद पवार यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -