घरमहाराष्ट्रनवाब मलिक यांनी मागितली माफी

नवाब मलिक यांनी मागितली माफी

Subscribe

नवाब मलिक यांनी अण्णा हजारे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर त्यांची लेखी माफी मागितली आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे काही दिवसांपूर्वी लोकपाल आणि लोकायुक्ताच्या नियुक्तीचा कायदा संपन्न होऊन त्याची अंमलबजावणी न झाल्याने त्यासंबंधी ३० जानेवारीला राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषणाला बसले होते. हा उपोषण अण्णा हजारे यांनी तब्बल ७ दिवसांनी मागे घेतला. पण उपोषण सुरु झाले तेव्हा काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णांवर टिका केली होती. मात्र आता त्यांनी अण्णांची जाहीर माफी मागितली आहे.

नवाब मलिक यांची टीका

जेव्हा सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे उपोषणाला बसले होते. त्यावेळी नवाब मलिक यांनी टीका केला होता की, अण्णा हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषण करतात. तसेच वकीलांकडून पैसे घेऊन उपोषणासा बसता, अशी बदनामीकारक टीका त्यांनी केली होती. नवाब मलिक यांच्या टिकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताबोडतोब केलेल्या बदनामीकारक व्यक्तवासंबंधी अण्णा हजारे यांची माफी मागून दिलगिरी व्यक्त केली होती. या प्रकरणी अण्णा हजारे यांनी नवाब मलिक यांच्यावर २ फेब्रुवारी रोजी अॅड. मिलिंद पवार यांच्यातर्फे कायदेशीर नोटीस पाठवली होती.

- Advertisement -

वाद वाढवायचा नाही

अण्णांवर केलेल्या बदनामीकारक टिकेच्या प्रकरणी नवाब मलिक हे नमले असून त्यांनी त्यासंबंधी अण्णांची लेखी माफी सुद्धा मागितली आहे. त्यामध्ये नवाब यांनी असे लिहिले की, आपण वडिलधारी व्यक्ती असून मन दुखावल्याने मी दिलगिरी व्यक्त करतो. असे त्यांनी लेखी दिले आहे. यावर आपल्याला देखील पुढे या प्रकरणी कोणताही वाद वाढवायचा नाही, असे अण्णा हजारे यांनी सांगितले आहे.

NCP spokerperson nawab malik apologies to anna hajare
नवाब मलिक यांचे माफी पत्र
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -