घरमहाराष्ट्रराजकारणात नेमके वय किती पाहिजे, हे सांगणारा जीआर काढावा; NCPचे अजित पवारांना...

राजकारणात नेमके वय किती पाहिजे, हे सांगणारा जीआर काढावा; NCPचे अजित पवारांना आवाहन

Subscribe

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला आहे. राज्य सरकारमध्ये निवृत्तीचे वय 58 असले तरी, काही लोक 80-84 वय झाले तरी थांबायला तयार नाही, अशी टिप्पणी अजित पवार यांनी शरद पवार यांचे थेट नाव न घेता केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड उत्तर देताना, राजकारणात नेमके वय किती पाहिजे तसा एक जीआर काढावा, असे आवाहन अजित पवार यांना केले आहे.

हेही वाचा – Vikhe Patil Vs Raut : ‘राऊतांनी किती जणांचे संसार देशोधडीला लावले याची यादीच काढणार’; विखेंचा इशारा

- Advertisement -

ठाण्यामध्ये काल, रविवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. वय झाल्यानंतर थांबायचे असते, ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. माणूस साठीला आला की निवृत्त होतो. राज्य सरकारमध्ये 58 वयात रिटायर्ड होतात. आता वयाच्या साठीपर्यंत निवृत्तीचे वय करण्याची मागणी केली जात आहे. मात्र काही 80 – 84 वय झाले तरी रिटायर्ड व्हायला तयार नाही. काही चुकत असले तर त्यांनी सांगितले पाहिजे. पण ते थांबायला तयार नाहीत, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

- Advertisement -

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी, अजितदादा मला कळत नाही राजकारणात अन् समाजकारणात वयाची भानगड काय आहे? वयापेक्षा आपली नीतिमत्ता, आपले आचार-विचार, आपले कर्तृत्व महत्त्वाचे नाही का? असा प्रश्न केला आहे.

अजित पवार हे 37 वर्षीय युवा आमदार रोहित पवार यांना बच्चा म्हणतात आणि 84 वर्षीय लोकनेते शरद पवार यांच्या निवृत्तीचा आग्रह धरतात; मात्र दुसरीकडे 73 वर्षीय नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी स्वतः ज्येष्ठ नागरिक (64 वर्षे) असल्याचे विसरून आग्रह करताना ते दिसत आहेत. राजकारणात नेमके वय किती पाहिजे तसा एक जीआर काढावा. तसा एखादा कायदा करून दाखवावा. दररोज भाजपाची भाषा बोलू नका, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे.

हेही वाचा – Bilkis Bano : लोकशाहीमूल्यांची पायमल्ली होत असताना…, रोहित पवार यांचा केंद्रावर निशाणा

अजित पवार यांना अभ्यासू युवक नकोत, कर्तृत्ववान आदर्श सुसंस्कृत ज्येष्ठ नेते नकोत… मग अजितदादांना फक्त स्वतःची सत्ता हवी आहे की, त्यांचा वैचारिक गोंधळ झाला आहे? त्यांनी आपले राजकीय वैचारिक अंतिम ध्येय सांगायला हवे तसेच अजित पवार यांनी सुद्धा निवृत्तीचे वय जाहीर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अजित पवार यांना शरद पवार कळलेच नाहीत, हे आता जनतेला समजू लागले आहे. शरद पवार ही व्यक्ती नसून एक विचार आहे, हे लक्षात ठेवावे. त्यांचे विचार कसे निवृत्त करणार आहात? असा सवाल करून लवांडे म्हणाले की, शिव-शाहू-फुले-आंबेडकर असो की महात्मा गांधी-नेहरू असोत, त्यांचे विचार मारता येत नाहीत; मग तुमच्याकडे कितीही पैसा असो किंवा कोणतीही सत्ता असू द्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -