घरमहाराष्ट्रNeelam Gorhe : औद्योगिक क्षेत्रातील दुर्घटना टाळण्यासाठी कृती आराखड्याची गरज - गोऱ्हे

Neelam Gorhe : औद्योगिक क्षेत्रातील दुर्घटना टाळण्यासाठी कृती आराखड्याची गरज – गोऱ्हे

Subscribe

मुंबई : विधानभवन येथे पुणे व पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, महानगर क्षेत्रांसह राज्यभरात होणाऱ्या औद्योगिक दुर्घटनांविषयी उपाययोजना करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी तसेच महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिपूर्ण कृतीआराखडा तयार करावा, अशा सूचना दिला आहेत. (Need for action plan to prevent accidents in industrial sector Instructions for Neelam Gohra)

हेही वाचा – Vijay Wadettiwar : “मोदींची गॅरंटी” कधीही पूर्ण न होणारी; ‘चाय पे चर्चेचा’ संदर्भ देत वडेट्टीवारांची टीका

- Advertisement -

औद्योगिक दुर्घटनांविषयी उपाययोजना करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच त्या म्हणाल्या की, महापालिका, औद्योगिक सुरक्षा, गृह, पर्यावरण विभाग यांच्या एकत्रित समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. राज्यात औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या धोकादायक पदार्थांचे नियमन होणे आवश्यक आहे. त्यामुळे अतिरिक्त रसायन साठा ठेवून होणाऱ्या दुर्घटनावर काही प्रमाणात बंधन आणणे शक्य होईल, तसेच या रसायनांचा मर्यादित साठा व आवश्यक तो योग्य वापर होत असल्याबाबत खात्री करता येईल.

औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने उद्योगांमध्ये अंतर्गत भागात सीसीटीव्ही बसवावेत, उद्योगांपर्यंत जाणारे रस्ते अग्निशमन यंत्रणा पोहचेल असे असावेत, ग्रामीण भागासाठी लहान अग्निशमन यंत्रणा खरेदी कराव्यात, लहान अग्निशमन केंद्रे स्थापन करावीत, सर्व जिल्ह्यांनी त्यांची आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Neelam Gorhe : औद्योगिक क्षेत्रातील दुर्घटना टाळण्यासाठी कृतीआराखड्याची गरज; नीलम गोऱ्हेंच्या सूचना

प्रत्येक उद्योग आस्थापना यांना त्यांचे उद्योगामध्ये महिला कामगारांच्या लहान बाळांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करावा, सर्व कारखान्यांचे फायर सेफ्टी ऑडिट करावे, सर्व कामगारांना कारखान्यातर्फे विमा संरक्षण पुरविण्यात यावा, अपघातामध्ये मृत व जखमी कुटुंबांचे तत्काळ पुनर्वसन करावे, अपघातग्रस्त कुटुंबांना तत्काळ कारखान्याने आर्थिक मदत करावी, अपघातबाधित मुलांचे व मुलींचे शिक्षणात खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी, आपत्ती व्यवस्थापन कायद्याची सक्षमपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.

दरम्यान, या बैठकीस औद्यागिक सुरक्षा विभागाचे संचालक देवीदास गोरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभडे- पाटील, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, रमेश चव्हाण, कैलास केंद्रे, संतोष वारीस, भरत कळसकर, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. शैलेश गुजर आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -