घरमहाराष्ट्रVijay Wadettiwar : "मोदींची गॅरंटी" कधीही पूर्ण न होणारी; ‘चाय पे चर्चेचा’...

Vijay Wadettiwar : “मोदींची गॅरंटी” कधीही पूर्ण न होणारी; ‘चाय पे चर्चेचा’ संदर्भ देत वडेट्टीवारांची टीका

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींचा यवतमाळ दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच या दौऱ्यात यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे महिला बचत गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 2014 च्या नरेंद्र मोदींच्या यवतमाळ दौऱ्याचा संदर्भ देत टीका केली आहे. तसेच “मोदींची गॅरंटी” कधीही पूर्ण न होणारी असा टोलाही लगावला आहे. (Modis Guarantee Never Fulfilled Vijay Wadettiwars criticism referring to the chai pe discussion)

हेही वाचा – Vijay Wadettiwar : “होऊ दे खर्च”; मोदींसाठी 12 कोटींचा चुराडा; वडेट्टीवारांचे टीकास्त्र

- Advertisement -

विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून 2014 मध्ये नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्याच्या दाभडीत आले होते. ‘चाय पे चर्चा’ करून त्यांनी शेतकऱ्यांना शेतीविकासाची स्वप्नं दाखविली. तत्कालीन खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी दाभडी गाव विकासासाठी दत्तक घेतले. गावकऱ्यांनी विश्वास दाखविला पण मोदींनी आश्वासने पूर्ण केली नाहीत.

- Advertisement -

खोटी आश्वासने देऊन मोदींनी घेतलेल्या मतांच्या स्मरणार्थ 2017 मध्ये दाभडीतील शेतकरी दिल्लीत धडकले. जंतर-मंतरवर आठ दिवस उपोषण केले. ना मोदी आले ना त्यांचे तत्कालीन खासदार हंसराज अहिर आले. रिकाम्या हातांनी शेतकरी गावात परतले. नंतर 16 फेब्रुवारी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी पांढरकवड्याला आले होते. गावापासून काही अंतरावर दाभडीचे शेतकरी मोदींच्या भेटीसाठी आशेने थांबले होते. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दिवसभर बसवून ठेवले, पण पंतप्रधान मोदींची भेट काही झाली नाही.

हेही वाचा – Sanjay Raut : “अमित शाहांचे वक्तव्य हास्यास्पद”, परिवारवादाच्या मुद्द्यावरून राऊतांचा टोला

आता गावकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या आश्वासनांचे स्मरण करून देण्यासाठी गावात बॅनर लावले आहेत. आज, 28 फेब्रुवारीला यवतमाळ जवळील बोरी येथे बचत गटाच्या महिलांशी मोदी संवाद साधणार आहेत. पुन्हा त्यांना नवी स्वप्ने दाखवतील आणि खोटी आश्वासने दिली जातील. डुप्लिकेट गॅरंटी देऊन मत मागतील. पण, दाभडीत दिलेल्या आश्वासनांवर ते बोलतील? की खोटे बोलून ही गॅरंटी मी दिलीच नसल्याचे सांगतील? गेले ते दिवस… जनतेकडे राहिल्या फक्त पोकळ आश्वासनांच्या आठवणी आणि कधीही पूर्ण न होणारी मोदींची गॅरंटी, असा टोला विजय वडेड्डीवार यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -