घरCORONA UPDATECoronavirus : मुंबईत कोरोनाचे नवे १३५ रुग्ण 

Coronavirus : मुंबईत कोरोनाचे नवे १३५ रुग्ण 

Subscribe

मुंबईमध्ये रविवारी कोरोनाचे १३५ नवे रुग्ण सापडले असून रुग्णांची संख्या २७९८ वर पोहचली आहे.

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत काही दिवसांपासून चढ-उतार होत असताना रविवारी पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा चढा राहिला. मुंबईमध्ये रविवारी कोरोनाचे १३५ नवे रुग्ण सापडले असून रुग्णांची संख्या २७९८ वर पोहचली आहे. तर ६ जणांचा कोरोनाने बळी घेतल्याने मृतांचा आकडा १३१ वर पोहचला आहे. मात्र दुसरीकडे रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ होत असल्याने मुंबईसाठी दिलासादायक बाब आहे. 

मुंबई शनिवारी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली


दोन दिवसांपूर्वी मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने दिलासा मिळाला होता. परंतु शनिवारपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळाली. मुंबईमध्ये रविवारी १३५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २७९८ वर पोहोचला आहे. तसेच मुंबईमध्ये ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १३१ वर पोहचला आहे. मृत झालेल्या व्यक्तींपैकी ५ जण हे दीर्घकाळ आजारी होते तर एकजण वयोवृद्ध होते. त्याचप्रमाणे रविवारी ३०३ कोरोनाचे संशयित रुग्ण सापडले असून बरे झालेल्या २९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत मुंबईतून तब्बल ३१० जणांना घरी सोडण्यात आले आहे.

१५४ चाचणी अहवाल रविवारी प्राप्त झाले

- Advertisement -

दरम्यान १४ ते १६ एप्रिलदरम्यान विविध प्रयोगशाळांमध्ये झालेल्या १५४ चाचणी अहवाल रविवारी प्राप्त झाल्याने त्यामध्ये पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांची नोंद रविवारच्या अहवालात करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या साथरोग कक्षाच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -