घरCORONA UPDATECoronaVirus: पवईत तरुणी कोरोना पॉझिटिव्ह; परिसर केला सील

CoronaVirus: पवईत तरुणी कोरोना पॉझिटिव्ह; परिसर केला सील

Subscribe

पवईतील गौतम नगरमध्ये रविवारी एक‌ तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळली असताना पवईच्या दुसऱ्या टोकाला असलेली महात्मा फुले नगरातील चाळ पालिकेकडून अचानक सील केल्याने वस्तीत गोंधळ उडाला.

पवईतील गौतम नगरमध्ये रविवारी एक‌ तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळली असताना पवईच्या दुसऱ्या टोकाला असलेली महात्मा फुले नगरातील चाळ पालिकेकडून अचानक सील केल्याने वस्तीत गोंधळ उडाला. प्रभाग क्रमांक १२१ मध्ये येणाऱ्या गौतमनगर भागात एक १९ वर्षीय तरुणी कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने पालिकेच्या ‘एस’ विभागातर्फे संपूर्ण परिसर सील करण्यात आला. लोकांना परिसरात येण्या-जाण्यास मज्जाव करण्यात आला.

काय आहे प्रकरण 

ही तरुणी कुपर रुग्णालयात इतर आजारावर उपचार घेत असताना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. या बाधित रुग्णामुळे पवईतील कोरोना बाधितांची संख्या ९ वर पोहोचली आहे. बाधित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु असताना शंका आल्याने तिची तपासणी करण्यात आली होती. ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न होताच कोरोना रुग्णालयात हलवत तिच्यावर पुढील उपचार सुरु करण्यात आले आहेत, असे याबाबत बोलताना पालिका आरोग्य विभागाने सांगितले. दरम्यान, पवई पूर्वेकडील महात्मा फुले नगरातील मातोश्री चाळीतील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचा संशय असल्याने हा परिसर सील करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

नाशिक जिल्ह्यासाठी मोफत वैद्यकीय सेवा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -