घरताज्या घडामोडीNIA चे महासंचालक वाय सी मोदी मुंबईत, IPS अधिकाऱ्यांच्या चौकशीची शक्यता

NIA चे महासंचालक वाय सी मोदी मुंबईत, IPS अधिकाऱ्यांच्या चौकशीची शक्यता

Subscribe

नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) चे महासंचालक योगेश चंदर मोदी हे अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या तपास प्रकरणात मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई पोलिस दलातील बड्या अधिकाऱ्यांची चौकशी एनआयएच्या महासंचालकांकडून होणे अपेक्षित आहे. या संपुर्ण प्रकरणात एनआयएकडून अटक करण्यात आलेले सचिन वाझे यांच्या तपासात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्यानेच एनआयएच्या महासंचालकांकडून मुंबई पोलिसांमधील बड्या अधिकाऱ्यांची या प्रकरणात चौकशी होणे अपेक्षित आहे. स्वतः योगेश चंदर मोदी या संपुर्ण तपासात जातीने लक्ष घालून आहेत. त्यांच्या मुंबईतल्या आगमनामुळे या प्रकरणात मुंबई पोलिस दलातील मोठे मासेही गळाला लागतील असा अंदाज वर्तवणयात येत आहे.

सीआययू युनिटचे सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझे यांना एनआयएची २५ मार्चपर्यंत कोठडी मिळाली आहे. एनआयएचे पोलिस अधिक्षक दर्जाचे अधिकारी असलेले विक्रम खलाटे या प्रकरणात आतापर्यंत तपास करत आहेत. पण योगेश चंदर मोदी यांच्या तपासाताली सहभागामुळे मुंबई पोलिस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. योगेश चंदर मोदी हे १९८४ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहे. तसेच मोदींचा कार्यकाळ हा मे २०२१ रोजी संपत आहे. मुंबई पोलिस दलातील आयपीएस अधिकारी हे वरिष्ठ आणि जास्त अनुभवाचे असल्यानेच योगेश चंदर मोदी यांच्या सेवा जेष्ठतेमुळेच त्यांच्याकडून या अधिकाऱ्यांची चौकशी होईल असे बोलले जात आहे. दुसरीकडे सचिन वाझे हे एनआयएला तपासात सहकार्य करत नसल्याचीही बाब समोर आली होती. तसेच पोलिस अधिक्षक विक्रम खलाटे यांच्या टीमला संपुर्ण प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयास्पद वाटत असल्यानेच मोदी यांची एंट्री महत्वाची मानली जात आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -