घरमहाराष्ट्रयुती झाली नसती तर आघाडीने लुटले असते - नितीन बानगुडे पाटील

युती झाली नसती तर आघाडीने लुटले असते – नितीन बानगुडे पाटील

Subscribe

नितीन बानगुडे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीवर टीका केली आहे. 'जर युती झाली नसती तर आघाडी पुन्हा देश लुटायला सज्ज झाली असती', अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

शिवसेना भाजपा यांची युती होवु नये यासाठी आघाडीने देव पाण्यात बुडविले होते. युती होणार नाही असे वातावरण होते. तेव्हा अनेक धुरंधर नेते मी लोकसभा लढणार असे म्हणत होते. परंतु जेव्हा युती जाहीर झाली तेव्हा लढणार म्हणणारे अनेक रथी महारथी यांनी शेपुट घातले आणि मी नाही लढणार, असे जाहीर करू लागले. जर युती झाली नसती तर आघाडी पुन्हा देश लुटायला सज्ज झाली असती. ही संधी त्यांना पुन्हा मिळु नये, म्हणुनच युती करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून सातारामध्ये परिवर्तन घडविल्या शिवाय राहणार नाही, असे शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील म्हणाले आहेत. शिवसेना-भाजपा यांच्यासह घटकपक्षांच्या महायुतीचा मेळावा हॉटेल ड्मिलॅण्डच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सातारा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सातारा सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नितिन बानुगडे पाटील बोलत होते.

शरद पवारांच्या निर्णयाची खिल्ली

शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढविणार होते. मात्र, त्यांनी पार्थ पवारसाठी माघार घेतली. त्यांच्या याच निर्णयाचे नितीन बानगुडे पाटील यांनी खिल्ली उडवली. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्र्राईकचा निर्णय घेतला. आपल्या शुर जवानांनी प्राणाची बाजी लावुन पाक मध्ये घुसून दहशवादयांचे अड्डे उदध्वस्त केले, असे मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात मांडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -