घरमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेस करणार कन्हैया कुमारचा प्रचार

राष्ट्रवादी काँग्रेस करणार कन्हैया कुमारचा प्रचार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा धर्म पाळणार असून देशपातळीवर जिथे जिथे मित्र पक्षाचे उमेदवार उभे आहेत. तिथे तिथे त्यांचा प्रचार करणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कन्हैया कुमार याचा बेगूसरायमध्ये प्रचार करणार आहे. तसेच राष्ट्रवादी महाआघाडीत असल्यामुळे राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांचा प्रचार देखील अमेठी आणि रायबरेलीत करणार आहे, अशी घोषणाच आज राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी.पी. त्रिपाठी यांनी केली आहे. कन्हैया कुमार हा भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे बेगसूरायमध्ये निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादीने त्याला आपला पाठींबा जाहीर केला. त्याचप्रमाणे त्याच्या प्रचारात देखील राष्ट्रवादी सहभाग घेणार आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर ज्या ज्या ठीकाणी महाआघाडीचा उमेदवार असेल, तिथे तिथे आम्ही प्रचार करू अशी घोषणा देखील डी.पी. त्रिपाठी यांनी केली आहे. बनारसमधून मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांचा एक उमेदवार देण्याबाबत विचार सुरु असल्याचेही त्रिपाठी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. निवडणूक आचारसंहितेचे सक्तीने पालन व्हायला हवे. एखाद्याचा बायोपिक येणार असेल तर त्यातील गोष्टींकडे निवडणूक आयोगाने लक्ष देवून कारवाई करायला हवी, असेही त्रिपाठी म्हणाले.

- Advertisement -

आधी १२ वीची मार्कशिट दाखवा, मग जाहीरनाम्यावर बोला

जो माणूस १२ वी पास नाही. ज्या व्यक्तीला कागद वाचता येत नाही त्याला राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यावर बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात नवाब मलिक यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या टिकेला सडेतोड उत्तर दिले आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर टिका केली होती. त्यावर नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला. विनोद तावडे हे १२वी नापास आहेत. त्यांची डिग्रीसुध्दा बोगस आहे. त्यामुळे त्यांना कागद वाचता येत नाही, हे सिध्द केल्यामुळेच ते जाहिरनाम्यावर टीका करत आहेत. विनोद तावडे यांनी आधी बारावी उत्तीर्ण असल्याचा दाखला दाखवावा आणि नंतर जाहीरनाम्यावर टिका करावी, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -