घरमहाराष्ट्रपालघर जिल्ह्यात कुपोषणामुळे बालमृत्यू झाले नाहीत - पंकजा मुंडे

पालघर जिल्ह्यात कुपोषणामुळे बालमृत्यू झाले नाहीत – पंकजा मुंडे

Subscribe

मुदतपूर्व प्रसृती झाल्याने १५ बालके दगावली आहेत. यात एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झाला नसल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

अब्दुल कलाम आहार योजनेअंतर्गत गर्भदा आणि स्तनदा मातांना उच्च प्रतीचा पोषण आहार मिळावा यासाठी बालआरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहेत. आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभागाने संयुक्त‍िकरित्या काम करून बालमृत्यूदरात घट आणली आहे. पालघर जिल्ह्यात २०१७ ते २०१८ काळात ४६९ आणि २०१८ ते २०१९ या काळात ३४८ बालकांचे मृत्यू हे विविध आजारांमुळे झाले आहेत. तर मुदतपूर्व प्रसृती झाल्याने १५ बालके दगावली आहेत. यात एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झाला नसल्याची माहिती महिला व बालकल्याण विकास विभाग मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.

धान्य पुरवठा कमी झाल्यामुळे पुरवठ्यात कपात

पालघर जिल्ह्यातील महिलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात कपात केल्याबद्दल आमदार अबू आझमी यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. पोषण आहारासाठी महिला बचतगटांना होणाऱ्या धान्याच्या पुरवठ्यामध्ये कपात २०१६ पासून सुरु असून २०१८ मध्ये तांदळात ६१.२० टक्के तर गहू पुरवठ्यामध्ये ७२.२२ टक्के इतकी कपात करण्यात आली. मात्र, केंद्र शासनाकडूनच कमी प्रमाणात धान्य पुरवठा झाल्यामुळे ही कपात करण्यात आली होती. मात्र २०१९ मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान अतिरिक्त अन्नधान्य साठा केंद्राकडून प्राप्त झाल्यामुळे पुर्वीप्रमाणेच धान्य साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यापुढे अशी कपात करण्याची गरज भासू नये याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

कुपोषणामुळे होणारे मृत्यूमध्ये लक्षणीय घट

पोषण आहारासाठी राज्यात स्वतंत्र निधी असून, बालमृत्यूचे प्रमाण कमी असण्यामध्ये शासन पहिल्या क्रमांकावर आहे. कुपोषण पुर्णत: संपविण्यासाठी शासन विशेष मोहीम राबविणार आहे. कुपोषणाची आकडेवारीही मुंडे यांनी दिली. २०१६ साली ८६१ बालके अतित्रिव कुपोषित (Standerd Malnutrician)होती, ही संख्या कमी होऊन २०१९ मध्ये २१८ झाली आहे. तर २०१७ साली ३ हजार ३६२ बालके मध्यम कुपोषित होती, तर २०१९ मध्ये ही संख्या १ हजार ९२० झाली आहे. गेल्या चार वर्षात कुपोषणामुळे होणारे मृत्यूमध्ये लक्षणीय घट झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -