घरठाणेआता सामाजिक आणि आर्थिक लढाई लढणार- राजरत्न आंबेडकर

आता सामाजिक आणि आर्थिक लढाई लढणार- राजरत्न आंबेडकर

Subscribe

डॉक्टर बाबासाहेबांनी सहकार क्षेत्र निर्माण करीत कोऑपरेटीव्ह ॲक्टची निर्मिती केली

कल्याण । डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानंतर आम्ही त्यांच्या दिशानिर्देशांवर काम करीत नाही, केवळ राजकीय न्यायासाठी आपण लढत आहोत, सामाजिक आणि आर्थिक न्यायाची लढाई सोडून दिली असल्याने यापुढे आम्ही त्याला प्राधान्य देणार असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी कल्याण येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

डॉक्टर बाबासाहेबांनी सहकार क्षेत्र निर्माण करीत कोऑपरेटीव्ह ॲक्टची निर्मिती केली. याचा मोठ्या प्रमाणात फायदा शरद पवारांसारखे नेते करताना दिसून येत आहेत. असे सांगत राजरत्न म्हणाले की या सहकार क्षेत्राकडे आपण अभ्यासासाठी देखील बघितले नसल्याचे खंत त्यांनी व्यक्त केली. समाजातील लोकांना संघटित करून स्वतःची आर्थिक व्यवस्था कशी निर्माण करता येईल, यावर प्रामुख्याने आपण आता काम करण्यास सुरुवात केली आहे. सारस्वत बँकेने १०४ वर्षे गाठल्याचे उदाहरण देत ही नव्याने उभारली जाणारी अर्थव्यवस्था केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित राहणार नसून राष्ट्रीय पातळीवर तिला घेऊन जाऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माझ्या अगोदरच्या पिढीने सहकार क्षेत्रातील अर्थव्यवस्थेवर जर इमाने इतबारे काम केले असते तर आज आमची स्वतंत्र अर्थव्यवस्था असती आणि आम्हाला कुणालाही, कुठेही अर्थ सहाय्यतेसाठी हात पसरण्याची वेळ आली नसल्याचे राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.

- Advertisement -

ते आजही आमची कुचेष्टा करतात
महात्मा फुले , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांविषयी आजही येथील प्रस्थापित त्यांना शिक्षण संस्था उभारणीकरता भिक मागितल्याचे खुलेआम सांगत आहे. आजही ते आम्हाला मागणाऱ्यांच्या यादीत ठेवू इच्छितात.

कल्याणच्या प्र. के. अत्रे रंग मंदिरात नुकताच सहकार अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी एका कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. तुडुंब भरलेल्या या रंग मंदिरात ठाणे जिल्ह्यातून तीन हजार सदस्यांनी शेअर्स फॉर्म भरीत राजरत्न आंबेडकर सहकार बँक निर्मितीला यावेळी उदंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सहकारी कायद्यानुसार साखर कारखाने, दुग्ध व्यवसाय, जिल्हा मध्यवर्ती बँक, सूतगिरण्या आहेत. डॉ बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या या ॲक्टमुळे हे सर्व झाले, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -