घरमहाराष्ट्रउल्हासनगर विधानसभा मतदार संघात ओमी कलानी सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

उल्हासनगर विधानसभा मतदार संघात ओमी कलानी सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ओमी कलानी हे ५२ कोटींपेक्षा अधिक मालमत्तेचे मालक

उल्हासनगर विधानसभा मतदार संघात अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मालमत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ओमी कलानी यांच्याकडे आहे. ते ५२ कोटींपेक्षा अधिक मालमत्तेचे मालक आहेत. शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उल्हासनगर विधानसभेत तब्बल २४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओमी कलानी, ज्योती कलानी, भरत गंगोत्री, भाजपचे कुमार आयलानी, मीना आयलानी, भगवान भालेराव हे प्रमुख उमेदवार आहेत. त्यांनी त्यांच्या सत्य प्रतिज्ञापत्रात जंगम मालमत्ता, स्थावर मालमत्ता, कर्ज आणि शिक्षणाबाबत माहिती देण्यात आली आहे.

या माहितीत मालमत्तेच्या बाबतीत ओमी कलानी हे आघाडीवर आहेत. त्यांच्याकडे ५२ कोटींपेक्षा अधिक मालमत्ता असून ११ लाख रुपयांचे कर्ज आहे. ओमी कलानीचे शिक्षण १२ वी आहे. त्यांच्या आई ज्योती कलानी यांच्याकडे १४ कोटींची मालमत्ता आहे , भाजपचे उमेदवार कुमार आयलानी आणि त्यांची पत्नी मीना आयलानी यांचे मिळून २३ कोटींची मालमत्ता आहे. तर दाम्पत्यावर १० कोटींचे कर्ज आहे. कुमार आयलानी यांचे शिक्षण १० वी पास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भरत गंगोत्री यांच्याकडे त्यांची, पत्नी आणि कुटुंबाची मिळून ७ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्यावर ९ कोटींचे कर्ज आहे. गंगोत्री यांचे ही शिक्षण १२ वी झाले आहे. शनिवारी गंगोत्री यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला .

- Advertisement -

युतीचे बंडखोर उमेदवार भगवान भालेराव यांच्याकडे ५६ लाख रुपयांचे सोने नाणे आहे, तर १ करोड रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. भालेराव हे १० वी नापास आहेत.


हेही वाचा – विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ८०० उमेदवारांचे अर्ज नामंजूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -