घरमुंबईपक्षश्रेष्ठी बंडखोरांना माघार घ्यायला लावतील - पालकमंत्री एकनाथ शिंदे

पक्षश्रेष्ठी बंडखोरांना माघार घ्यायला लावतील – पालकमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

शिवसेना भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असल्याची विचारणा केली असता त्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षश्रेष्ठी बंडखोरांना माघार घ्यायला लावतील, असे उत्तर दिले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेऊन बंडखोरांना माघार घ्यायला लावतील अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना दिली आहे.  शिवसेना भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी त्यांना छेडले असता पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी बोट दाखवले आहे.

डोंबिवलीत महायुतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण यांच्या प्रचाराचा नारळ रविवारी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवलीत वाढविण्यात आला. यावेळी महायुतीचा मेळावाही पार पडला. या मेळाव्यास भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे महापौर विनिता राणे यांच्यासह शिवसेना भाजप आणि रिपाईचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.  सर्व ठिकाणी महायुतीचे उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास राज्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला. कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांचा पत्ता कट करून नगरसेवक रमेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, भोईर यांना मातोश्रीवर बोलावून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाराजी दूर केली असतानाही आमदार भोईर हे मेळाव्याला गैरहजर असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मानखुर्द शिवाजीनगरमधून रिपाईचे सोनावणे निवडणूकीतून घेणार माघार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -