घरमहाराष्ट्रआरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या; बदल्यांमधील गैरप्रकाराला बसणार चाप

आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या; बदल्यांमधील गैरप्रकाराला बसणार चाप

Subscribe

आरटीओमधील बदल्या या प्रसार माध्यमांमध्ये, विधीमंडळाच्या अधिवेशनांमध्ये चर्चेत असायच्या. मोक्याची जागी बदली मिळावी म्ह्णून अधिकारी हे मंत्री, खासदार, आमदार यांच्या मार्फत विभागावर दबाव आणत होते.

मुंबई : राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांपाठोपाठ आता परिवहन अर्थात आरटीओ विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाइन केल्या आहेत. अशा प्रकारच्या ऑनलाइन बदलीमुळे आरटीओमधील बदल्यांच्या गैरप्रकाराला चाप बसणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी (18 ऑक्टोबर) संगणकाची कळ दाबून 166 मोटार वाहन निरीक्षक आणि 314 सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या बदलीची अंतिम यादी काढण्यात आली. या बहुतांश अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंती क्रमानुसार बदली देण्यात आली आहे. (Online transfers of RTO officers Mistakes in transfers will be covered)

आरटीओमधील बदल्या या प्रसार माध्यमांमध्ये, विधीमंडळाच्या अधिवेशनांमध्ये चर्चेत असायच्या. मोक्याची जागी बदली मिळावी म्ह्णून अधिकारी हे मंत्री, खासदार, आमदार यांच्या मार्फत विभागावर दबाव आणत होते. त्यावर उपाय म्हणून शिंदे यांनी बदल्यांची कार्यवाही पारदर्शकपणे आणि संगणीकृत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विभागाने ही प्रणाली विकसीत केली असून, त्याचे सादरीकरण विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी 18 ऑक्टोबर रोजी सह्याद्री येथे आयोजित बैठकीत केले. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अतिरीक्त आयुक्त जितेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबादेवी मंदिर परिसरात उभारणार बहुमजली पार्किंग- पालकमंत्री दीपक केसरकर

राज्यभर समप्रमाणात पदे भरली जाणार

परिवहन विभागाच्या काही विभागातील कार्यालांमध्ये निरीक्षक आणि सहायक निरीक्षक ही पदे रिक्त होती. आता या प्रणालीच्या माध्यमातून राज्यभर सर्वत्र समप्रमाणात पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी बदलीपात्र अधिकाऱ्यांकडून तीन पसंती क्रमाचे ठिकाण ऑनलाइन मागविण्यात आले आहेत. त्यानुसार यावर्षी बदलीपात्र अधिकाऱ्यांमध्ये 166 मोटार वाहन निरीक्षक आणि 314 सहायक मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश होता. त्यांची ऑनलाइन पद्धतीने अंतिम यादी आजच्या या बैठकीत तयार करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा : ठाकरे गटाच्या उपनेत्या मीनाताई कांबळी शिंदे गटात; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

पसंतीनुसार करण्यात आल्या बदल्या

ऑनलाइन बदल्यांमध्ये 166 मोटार वाहन निरीक्षकांपैकी 100 जणांना प्रथम पसंती क्रमानुसार, 35 जणांना द्वितीय पसंती क्रमानुसार, 15 जणांना तृतीय पसंती क्रमानुसार तर 16 जणांना रॅण्डमली बदली देण्यात आली आहे. या बैठकीच्या दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांबाबत चिंता व्यक्त केली. त्यासाठी अधिक तीव्र उपाययोजना करण्याचे त्यांनी निर्देश दिले. समृद्धी महामार्गावर वाहनांना थांबवू नका. त्यांची वेगमर्यादा निश्चित करा, असेही शिंदे यावेळी सांगितले. ठाण्यात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांसोबत विशेष परिवहन अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -