घरमहाराष्ट्र१० जानेवारीपासून राज्यात ओपन एसएससी बोर्डची स्थापना

१० जानेवारीपासून राज्यात ओपन एसएससी बोर्डची स्थापना

Subscribe

राज्यात ओपन एसएससी बोर्डला १० जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याची घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.

राज्यात ओपन एसएससी बोर्डला येत्या १० जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याची घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली आहे. या बोर्डामुळे कलाकार, खेळाडू आणि दिव्यांग मुलांना याचा मोठा लाभ होणार असल्याचे तावडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यांना होणार ओपन एसएससी बोर्डाचा फायदा

ओपन एसएससी बोर्डाची घोषणा केल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी वेळ देता येणार आहे. या बोर्डामुळे कलाकार, खेळाडू आणि दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे. कला आणि क्रीडा अशा क्षेत्रात कारकिर्द घडवू इच्छिणाऱ्या मुलांना क्रमिक अभ्यासामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत करणं कठीण होऊन जातं. तसेच खेळ, कला आणि अभ्यास या ओढाताणीत मुलांचं दोन्हीकडे नुकसान होतं. मात्र, ओपन एसएससी बोर्डाचा पर्याय उपलब्ध झाल्याने कला आणि क्रीडा क्षेत्रात रस असणाऱ्या मुलांना तसेच दिव्यांग मुलांना या ओपन एसएससी बोर्डाचा फायदा होणार आहे.

- Advertisement -

वाचा – ‘सनबर्न फेस्टिवलला’ सांकृतिक खात्यातर्फे परवानगी नाही – विनोद तावडे

वाचा – विद्यार्थ्यांनी सामाजिकदृष्ट्या जागृत असावे – विनोद तावडे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -