घरमुंबई४५ वर्षाच्या महिलेकडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण

४५ वर्षाच्या महिलेकडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण

Subscribe

महिलेने पीडित मुलाला त्याच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगू नये यासाठी धमकी देखील दिली होती. मुलावर घडलेला प्रकार ऐकल्यानंतर धक्का बसलेल्या वडीलांनी वांद्रे पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली.

मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी एका ४५ वर्षाच्या महिलेला अटक केली आहे. १२ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. आरोपी महिलेला कोर्टात हजर केले असता तिला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा वांद्रे पोलिसांकडून तपास सुरु आहे.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाचे आई – वडील वेगवेगळे राहतात. आपल्या आईला भेटण्यासाठी मुलगा वांद्र्यामध्ये राहणाऱ्या आईच्या घरी गेला होता. मुलाची आई त्यावेळी घरी नव्हती. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या महिलेने त्याला आपल्या घरी आईची वाट पाहत बसण्यास सांगितले. पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये पीडित मुलाने सांगितले की, महिलेच्या घरात बसलेलो असताना महिलेने माझे लैंगिक शोषण करत ३ ते ४ वेळा ओरल सेक्स केले. जे पाहता पीडित मुलगा खूप घाबरला. ऐवढ्यावर न थांबता महिलेने पीडित मुलासमोर नग्न होऊन मोबाईलवर फोटो काढून मुलाला घाबरवण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

कोणाला न सांगण्याची दिली धमकी

पीडित मुलाच्या वडीलांनी असे सांगितले की, जेव्हा ते मुलाला आणण्यासाठी पत्नीच्या घरी पोहचले तेव्हा तो खूप निराश होता. जेव्हा वडीलांनी विचारपूस केली त्यावेळी त्याने काहीच सांगितले नाही. मात्र नंतर त्याने त्याच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. महिलेने पीडित मुलाला त्याच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगू नये यासाठी धमकी देखील दिली होती. मुलावर घडलेला प्रकार ऐकल्यानंतर धक्का बसलेल्या वडीलांनी वांद्रे पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली.

महिलेची पोलीस कोठडीत रवानगी

मुलाने दिलेल्या जबाबानंतर आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली. महिलेला कोर्टात हजर केले असता कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेवर भारतीय दंड कायद्या अंतर्गत ३४१, ३४२ आणि लहान मुलांच्या लैंगिक शोषणासंदर्भात ६, ८,१२, (पनिशमेंट ऑफ सेक्सुअल चाइल्ड ) पोस्को अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी महिला पोलीस कोठडीत असून याप्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – 

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -