घरमहाराष्ट्रशाईफेकीचा विरोध करतो, पण..., रोहित पवारांचा सरकारला इशारा

शाईफेकीचा विरोध करतो, पण…, रोहित पवारांचा सरकारला इशारा

Subscribe

मुंबई : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूरमध्ये भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाईफेक केली. गेल्या वर्षभरात त्यांच्यावर ही दुसऱ्यांदा शाईफेक झाली आहे. याप्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शाईफेकीचा विरोध करतानाच सरकारलाही त्यांनी इशारा दिला आहे.

हेही वाचा – ‘समृद्धी’, अपघात आणि शोक हे दुष्टचक्र कधी थांबणार? ठाकरे गटाचा थेट सवाल

- Advertisement -

जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री हवा म्हणून चंद्रकांत पाटील यांना सोलापुरात विरोध आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. रविवारी संध्याकाळी चंद्रकांत पाटील शासकीय विश्रामगृहात येणार असल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण भीम आर्मीच्या अजय मैंदर्गीकर याने हे सुरक्षा कडे तोडत चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली. शासकीय नोकरभरतीचे खासगीकरण करण्याच्या धोरणाच्या निषेधार्थ हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी लगेचच अजय मैंदर्गीकर याला ताब्यात घेतले. यावेळी भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटी भरती विरोधात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवण्याचाही प्रयत्न केला.

- Advertisement -

यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. हे सरकार आल्यापासून त्यांची धोरणे ही युवांविरोधी असल्याने युवकांमध्ये संतापाची लाट आहे. पण या संतापाला वाट करून देऊन सरकारला वाटेवर आणण्याचे अनेक सनदशीर मार्गही उपलब्ध आहेत. त्यामुळे मंत्र्यांवर शाईफेक करणे चुकीचे असून चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचा मी विरोध करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Shiv sena Expands Executive Committee: ठाकरे गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार; तीन खासदारांसह सहा जण नेतेपदी

तथापि, यासोबतच सरकारनेही गेंड्याची कातडी पांघरून न बसता लोकांमधील संताप लक्षात घेऊन आपली जनहितविरोधी धोरणे बदलावीत. अन्यथा यापुढेही पदोपदी त्यांना लोकांच्या संतापाला आणि विरोधाला अधिक तीव्रतेने सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

डिसेंबरमध्येही झाली होती शाईफेक

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यावेळी चंद्रकांत पाटील हे मोरया गोसावी महोत्सवासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये गेले होते. तिथे ते एका कार्यकर्त्याच्या घरून निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -