घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांना समाजवादाची व्याख्या माहिती आहे का? राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, तुमची सडलेली...

मुख्यमंत्र्यांना समाजवादाची व्याख्या माहिती आहे का? राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, तुमची सडलेली भेलपुरी…

Subscribe

ज्या भाजपसोबत तुम्ही आता आहात त्यांचं पहिलं सरकार आणण्यासाठीही समाजवादीनेच पाठिंबा दिला होता, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आधी अभ्यास करावा, मग बोलावं, असा सल्लाही राऊतांनी यावेळी दिला.

मुंबई: मुख्यमंत्र्यांना समाजवादाची व्याख्या माहिती आहे का? त्यांना जाऊन आधी बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी यांचे संबंध काय आहेत ते विचारा. तसंच, आमची मिलावट झाली तर यांची भेलपुरी झाली आहे, ती पण सडलेली, असं म्हणत शिवसेना, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तसंच, ज्या भाजपसोबत तुम्ही आता आहात त्यांचं पहिलं सरकार आणण्यासाठीही समाजवादीनेच पाठिंबा दिला होता, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आधी अभ्यास करावा, मग बोलावं, असा सल्लाही राऊतांनी यावेळी दिला. (Does the Chief Minister Eknath Shinde know the definition of socialism Criticized by Sanjay Raut )

महाराष्ट्राच्या हितासाठी बाळासाहेब-समाजवादी एकत्र

राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या हितासाठी अनेकदा बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादीचे नेते एकत्र आले आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, सीमा प्रश्नांचा लढा अशा अनेक प्रश्नांमध्ये बाळासाहेब-समाजवादी एकत्र आले आहेत.

- Advertisement -

त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विचारा की, बॅरिस्टर नाथ पैंचं नाव कधी ऐकलं आहे का? गोदाताई परूळेकर, नानासाहेब गोरे, मधू दंडवते यांची नावं ऐकलीयंत का? ज्या ठाण्यातून तुम्ही येता तिथूनच अनेक समाजवाद्यांनी काम केलं आहे. याबाबत आधी माहिती घ्या आणि मग टीका करा, असा उपरोधिक सल्ला राऊतांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

कसली मिलावट, तुमची सडलेली भेलपुरी झालीय

राऊत म्हणाले की, जात, धर्म आधारावर समाजवाद्यांनी देशाला तोडण्याचं काम केलं नाही. मात्र, संघाने ते केलं आहे. ज्यांच्यासोबत तुम्ही आता आहात. आधी समाजवाद समजून घ्या, विधीमंडळाच्या वाचनालयात जाऊन वाचा, इतिहास समजून घ्या, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

- Advertisement -

इतकचं काय तर महापालिकेचा कारभार मराठीत व्हावा, यासाठी जॉर्ज फर्नांडीस यांनीच पहिला प्रस्तावा आणला होता. त्यामुळे कसली मिलावट नाही, तुमचीच भेलपुरी झालीय ती पण सडलेलली, असं म्हणत राऊतांनी शिंदेंसह भाजपवरही निशाणा साधला.

बाळासाहेबांच्या हयातीत शिंदे मुख्य वर्तुळात नव्हते

राऊत म्हणाले की, बाळासाहेबांची भूमिका काय होती याबाबतीत शिंदेंना कोणी सांगितलं माहित नाही. कारण, बाळासाहेबांच्या हयातीत शिंदे कधीच मुख्य वर्तुळात नव्हते. त्यांचं कार्यक्षेत्र हे केवळ ठाण्यापुरतं मर्यादित होतं, त्यामुळे त्यांनी आता इतिहास समजून घ्वावा आणि बोलावं असा घणाघात राऊतांनी केला.

(हेही वाचा: Shiv sena Expands Executive Committee: ठाकरे गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार; तीन खासदारांसह सहा जण नेतेपदी )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -