घरताज्या घडामोडीविधानसभेतील राड्याला जबाबदार १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन

विधानसभेतील राड्याला जबाबदार १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन

Subscribe

ओबीसी आरक्षणाच्या आरक्षणासासाठी केंद्र सरकारने इम्पेरिकल डाटा उपलब्ध करुन देण्याबाबतच्या ठरावाच्या निमित्ताने अध्यक्षांना अर्वाच्च भाषेत बोलणे, माईक ओढून घेणे, राजदंड उचलण्याचा प्रयत्न करणे तसेच अध्यक्षांच्या दालनात शिवीगाळ करणे, धक्काबुक्की करणे अशा प्रकारची वर्तवणुक केल्यासाठी जवळपास १२ आमदारांच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संमत करण्यात आला. एक वर्षांच्या कालावधीसाठी हे निलंबन करण्यात आले. संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी मांडलेल्या ठरावाला विधानसभेत मंजुरी मिळाल्यानंतर तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांनी निलंबनाची घोषणा केली. या निलंबनाला एकतर्फी असल्याचा उल्लेख करत तसेच लोकशाहीचा खून करण्यात आल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सातत्याने विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारवर हल्ला करतो म्हणून विरोधी पक्षाचा नंबर कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही फडणवीस म्हणाले.

कोणत्या १२ आमदारांचे निलंबन

संजय कुटे
आशिष शेलार
अभिमनूय पवार
गिरीश महाजन
हरीश पिंपळे
पराग अळवणी
हरीश पिंपळे
योगेश सागर
जयकुमार रावत
राम सातपुते
नारायण कुचे
बंटी बागडिया

- Advertisement -

वासरू मारल म्हणून गाय मारण्याचा प्रयत्न होऊ नये – देवेंद्र फडणवीस

अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवसेनेचे आमदार आणि भाजपचे आमदार यांच्यात धक्काबुक्की झाली. पण भास्कर जाधवजी आपल्याशी धक्काबुक्की झालेली नाही. शिवसेनेचे आमदार आणि इकडचे आमदार यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या धक्काबुक्कीमुळे मी सगळ्यांना बाहेर काढले. त्यानंतर आपण सगळे गळाभेटही घेतली. पण तुमच्याकडे असलेला प्रस्ताव हा तुमचे बहुमत असल्याने तुम्ही मंजुर करून घ्याल. आमच्या आमदारांनी त्यावेळी तीन वेळा माफी मागितली. आमच्यातील काही जणांचे शब्द चांगले नव्हते. पण विरोधकांची संख्या कमी करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले. आपण मोठ्या मनाने विरोधकांना बोलावून चर्चा करून कारवाई करायला हवी. वासरू मारल म्हणून गाय मारण्याचा प्रयत्न होता कामा नये असेही फडणवीस म्हणाले.

माफी फक्त आशीष शेलारांनी मागितली – भास्कर जाधव

ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतला ठराव मंजुर झाल्यानंतर अध्यक्षांच्या चेंबरमध्ये मी होतो त्यावेळी रागावलेले विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे आमदारांसह आले. त्यावेळी ते लालबूंद होऊन आले आणि आमदारांना आवरणार नाही असेही बोलले असा खुलासा भास्कर जाधव यांनी केला. माझी माफी फक्त फक्त आशीष शेलार यांनी मागितली. माझे कोकणातले आशीष शेलार अरे तुरे करत तुटून पडले. होय, आशीष शेलार यांनी तीनवेळा माफी मागितली खरी, पण हा प्रकार म्हणजे लात लावायची आणि सॉरी म्हणायचे असाच आहे. या सगळ्या प्रसंगानंतर सगळ्यांनी एकमेकांना मिठी मारली खरी, मीदेखील कामकाज संपल्यावर बाहेर जाऊन मिठी मारणार आहे असे भास्कर जाधव म्हणाले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -