घरताज्या घडामोडीकोरोना, म्युकरमायकोसिसनंतर 'या' घातक आजाराचं नवं संकट; मुंबईत आढळले ३ रुग्ण

कोरोना, म्युकरमायकोसिसनंतर ‘या’ घातक आजाराचं नवं संकट; मुंबईत आढळले ३ रुग्ण

Subscribe

कोरोनाच्या कहर दरम्यान चिंता वाढवणाऱ्या म्युकरमायकोसिस (काळी बुरशी)नंतर आता अजून एक संकट निर्माण झाले आहे. म्युकरमायकोसिसनंतर कोरोना बरे झालेल्या रुग्णांमध्ये एव्हस्क्यूलर नेक्रोसिस (Avascular necrosis- AVN) म्हणजेच हाडांचा मृत्यू होण्याची प्रकरणे आढळत आहे. या नव्या आजारामध्ये लोकांच्या शरीरातील हाडे गळू लागतात. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये एव्हरस्क्यूलर नेक्रोसिसचे तीन रुग्ण आढळले आहेत. या नव्या आजारामुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे. याबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, येत्या काळात या घातक आजाराचे प्रकरणे वाढू शकतात.

मुंबईतील एव्हस्क्यूलर नेक्रोसिस आजाराचे तिन्ही रुग्ण हिंदुजा रुग्णालय दाखल असून या रुग्णांचे वय ४० वर्षांपेक्षा कमी आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर दोन महिन्यांनंतर एव्हस्क्यूलर नेक्रोसिस म्हणजे हाडांचा मृत्यू होण्याची लक्षणे निर्माण होऊ लागली. म्युकरमायकोसिस आणि एव्हस्क्यूलर नेक्रोसिस दोन्ही स्टेरॉईड वापराशी जोडलेले आहे. माहितीनुसार, कोरोना रुग्णांच्या उपचारामध्ये स्टेरॉईडचा वापर केला जातो.

- Advertisement -

हिंदुजा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय अग्रवाल म्हणाले की, ‘या रुग्णांचा हाडांमध्ये वेदना जाणवत होत्या. हे तिन्ही रुग्ण डॉक्टर होते, ज्यामुळे लक्षणे ओळखणे सोप्पे होते आणि ते तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात पोहोचले. यातील ३६ वर्षांच्या एका रुग्णामध्ये कोरोना ठिक झाल्यानंतर ६७ दिवसांनी एव्हस्क्यूलर नेक्रोसिस आजाराची लक्षणे आढळली. तसेच इतर दोन रुग्णांमध्ये ५७ आणि ५५ दिवसांनी या आजाराची लक्षणे आढळली. सर्व रुग्णांना कोरोना उपचारादरम्यान स्टेरॉईड दिले गेले होते.’

एव्हस्क्यूलर नेक्रोसिस आजाराबाबत डॉ. अग्रवाल यांचे ‘एव्हस्क्यूलर नेक्रोसिस ए पार्ट ऑफ लाँग कोविड-१९’ हे शनिवारी प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नल ‘बीएमजे केस स्टडीज’मध्ये प्रकाशित झाले. यामध्ये त्यांनी सांगितले की, कोरोना प्रकरणात ‘जीवन रक्षक कॉर्टिकोस्टेरॉईड्सचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे’ एव्हस्क्यूलर नेक्रोसिस प्रकरणांमध्ये वाढ होईल.

- Advertisement -

यादरम्यान तामिळनाडूतील कोयंबतूरच्या सरकारी रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे २६४ रुग्णांमधील ३० रुग्णांना एका डोळ्याने दिसणे नाहीसे झाले आहे. याबाबत रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी रविवारी माहिती दिली. रुग्णालयाचे डीन डॉ. एन.निर्मला यांनी एका निवेदनात म्हटले की, दाखल केलेल्या सर्व लोकांची एंडोस्कोपी केली आणि ११० रुग्णांची सर्जरी केली आहे परंतु गंभीर संक्रमण झालेल्या ३० रुग्णांना एका डोळ्याने दिसणे नाहीसे झाले आहे. जे लोकं सुरुवातीला आले होते, ते या आजारातून बरे झाले आहेत.


हेही वाचा – अमेरिकेत प्राण्यांनाही कोरोनोची लस


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -