घरमहाराष्ट्रजगभरात साजरी होणार 'पु. लं' ची जन्मशताब्दी

जगभरात साजरी होणार ‘पु. लं’ ची जन्मशताब्दी

Subscribe

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे 'पु. लं देशपांडे' यांची जन्मशताब्दी जगभरात साजरी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे ‘पु. लं देशपांडे’ यांची जन्मशताब्दी जगभरात साजरी करण्यात येणार आहे. येत्या ८ नोव्हेंबरपासून त्यांच्या जन्मशताब्दीला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त देशातील २० शहरांसह पाच खंडांमधील ३० शहरांत ‘पु. लं’ च्या जन्मशताब्दाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लाडक्या ‘पु. लं देशपांडे’च्या जन्मशताब्दीचे आयोजन करण्यात आले आहे. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८ यावेळेत वि्शेष कार्यक्रमाचे आयोजन केले असून या महोत्सवात पुलं देशपांडे यांची दुर्मिळ भाषणे, माहितीपट दाखविला जाणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक असणार आहेत. त्यासोबत या कार्यक्रमात महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते ‘ग्लोबल पुलोत्सव’च्या लोगोचे देखील अनावरण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

पुण्यात पुलं महोत्सव

पुण्यामध्ये पुलं महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभर दर महिन्याच्या ८ तारखेला कार्यक्रम घेतला जाणार आहे, अशी माहिती आशय सास्कृंतिचे सतीश जकातदार यांनी दिला आहे. वीरेंद्र चित्राव, मेघराज राजेभोसले, प्रा. मिलिंद जोशी, कृष्णकुमार गोयल, गजेंद्र पवार, डॉ. सतीश देसाई यावेळी उपस्थित राहणार आहेत. पु. ल. कुटुंबीयांतर्फे दुर्मिळ दृकश्राव्य ठेवा रसिकांसाठी खुला केला जाणार आहे. ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ हा लघुपट ८ नोव्हेंबरच्या कार्यक्रमात दाखविला जाणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. या कार्यक्रमांचा प्रवेशिका नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ यावेळेत बालगंधर्व रंगमंदिरात उपलब्ध असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -