घरमुंबईशिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी जाणाऱ्या स्पीडबोटला अपघात

शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी जाणाऱ्या स्पीडबोटला अपघात

Subscribe

मुंबईमध्ये शिवस्मारक भूमीपूजन कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. कार्यक्रमासाठी २५ जणांना घेऊन जाणाऱ्या स्पीडबोटला अपघात एक जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईमध्ये शिवस्मारक भूमीपूजन कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. मान्यवरांच्या बोटीला अपघात झाला आहे. समुद्रात स्पीड बोट खडकावर आदळून अपघात झाला आहे. अपघातामध्ये कोणतिही जिवितहानी झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे. या बोटीमधून २५ जण प्रवास करत होते. या घटनेनंतर शिवस्मारकाच्या शुभारंभाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या स्पीडबोटीमध्ये लाईफगार्ड आणि सुरक्षारक्षक नव्हते. दोन हेलिकॉप्टर आणि बोटींमार्फत बचावकार्य सुरु आहे. काही जणांना सुखरुप समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आले आहे. बचावकार्य अजूनही सुरुच आहे.

- Advertisement -

स्पीडबोट खडकाला धडकली 

गिरगावजवळ स्पीडबोटला अपघात झाला आहे. शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गेलेल्या स्पीड बोटीला अपघात झाला आहे. स्पीडबोट खडकावर आदळल्याने बोटीला अपघात झाला. या बोटीमधूनल २५ जण शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी जात होते. सर्व जणांना सुरक्षितरित्या वाचवण्यात आले आहे. अपघात झालेल्या बोटीमध्ये अचानक पाणी शिरायला लागल्यामुळे बोटीत असणाऱ्यांची तारंबळ उडाली. बोटीमध्ये लाईफ जॅकेट अपुरे होते. त्याचबरोबर सुरक्षारक्षक आणि लाईफगार्ड बोटीत नव्हते.

- Advertisement -

सर्व जण सुखरुप 

मरिन ड्राईव्हच्या समुद्रकिनाऱ्यापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. आज या शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी दोन बोट जात होत्या. त्यामधील एका बोटीला अपघात झाला. मात्र या बोटीमध्ये असणारे सर्व जण सुखरुप असल्याची माहिती कोस्टगार्ड आणि मुंबई पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -