घरताज्या घडामोडीOBC Reservation : खुल्या प्रवर्गातील निवडणुका घेतल्यास ओबीसी समाजावर अन्याय - पंकजा...

OBC Reservation : खुल्या प्रवर्गातील निवडणुका घेतल्यास ओबीसी समाजावर अन्याय – पंकजा मुंडे

Subscribe

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका, या मागणीसाठी भाजपचं शिष्टमंडळ आज दुपारी १२ वाजता निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर सुद्धा असणार आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका. अशी मागणी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. तर भाजपमधल्या नेत्यांचं सुद्धा असंच म्हणणं आहे. त्यामुळे दुपारी १२ वाजताच्या सुमारास भाजपचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीला जाणार आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका. कारण खुल्या प्रवर्गातील निवडणुका घेतल्यास ओबीसी समाजावर अन्याय होईल. असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यामध्ये लक्ष द्यावे. अशी मागणी सुद्दा पंकजा मुंडे यांनी केली आहे.

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील आठवड्यात होणार आहेत. तसेच या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. मात्र, अवघ्या ४ दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. परंतु ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत असल्यामुळे ओबीसी नेते आक्रमक होताना दिसत आहेत. विशेषत: पकंजा मुंडे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.

ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्यापही कायम आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकारने बुधवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखिका केली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यामुळे राज्य सरकारला मोठा दणका बसला आहे. २०११ मध्ये गोळा केलेली माहिती सदोष असल्यामुळे ती उपयोगाची नाही. त्यामुळे ही माहिती राज्य सरकारला उपलब्ध करून देता येणार नाही, असं केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळली.

- Advertisement -

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत प्रस्ताव मंजूर करत राज्य निवडणूक आयोगाला विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. असा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला होता. त्यामुळे आता भाजपचं शिष्टमंडळ आज दुपारी १२ वाजता निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांची भेट घेणार आहे. तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका, अशी मागणी देखील करण्यात येत आहे.


हेही वाचा : ST workers strike : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम देऊनही संप सुरूच, ११ कर्मचारी बडतर्फ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -