घरक्राइमABHISHEK GHOSALKAR : "आज लोग बहोत सरप्राइज होंगे..."; अभिषेक यांच्या हत्येपूर्वी दोघांत...

ABHISHEK GHOSALKAR : “आज लोग बहोत सरप्राइज होंगे…”; अभिषेक यांच्या हत्येपूर्वी दोघांत काय संवाद झाला

Subscribe

मुंबई : फेसबुक लाइव्हदरम्यान उद्धव गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाई याने आपल्या कार्यालयातच पाच गोळ्या झाडल्या. या गोळीबारात अती रक्तस्त्रावाने घोसाळकर यांचा मृत्यू झाला. घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनेही स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. गोळीबारापूर्वी या दोघांमध्ये काय संवाद झाला, ते आता समोर आले आहे.

हेही वाचा – Live Updates : घोसाळकर गोळीबार प्रकरणी दोन जण ताब्यात

- Advertisement -

लागोपाठ घडलेल्या या गोळीबाराच्या दुसऱ्या घटनेमुळे मुंबई हादरली आहे. मृत अभिषेक घोसाळकर उद्धव गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा. मॉरिस आणि अभिषेक यांच्यात अनेक वर्षांपासून मतभेद होते. मात्र, या दोघांमधील वाद मिटल्याचे सांगितले जात होते. त्यातच गोळीबाराच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी हे दोघे एकत्र दिसले. मॉरिसने गुरुवारी आपल्या कार्यालयाबाहेर साडी वितरण कार्यक्रम ठेवला. घोसाळकर देखील तिथे पोहोचले. त्या दोघांनी गळाभेट घेतली. वाद मिटवून नेते एकत्र आल्याने कार्यकर्त्यांनी देखील आनंद व्यक्त केला. आपण एकत्र आल्याचे नागरिकांना समजावे म्हणून मॉरिसने साडेसातच्या सुमारास फेसबुक लाइव्हसाठी अभिषेक यांना कार्यालयात नेले. लाइव्हमध्ये देखील चांगली कामं करण्यासाठी आम्ही मतभेद बाजूला करून एकत्र आल्याचे दोघांनी सांगितले. हेच आता बाहेर जाऊन कार्यकर्त्यांसमोर सांगूया, गॉड ब्लेस यू, असं म्हणत अभिषेक घोसाळकर उठले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. यातून सावरायचा वेळही त्यांना मिळाला नाही.

फेसबुक लाइव्हमध्ये दोघे काय बोलले?

चार मिनिटांच्या या फेसबुक लाइव्हमध्ये मॉरिस सुरुवातीला गॉड ब्लेस यू म्हणत घोसाळकरांना बोलण्यास सांगतो. त्यावर घोसाळकर आज मॉरिस भाईंसोबत लाइव्ह येण्याची संधी मिळाली, हे पाहून अनेक जण सरप्राइज होतील असे म्हणतात. घोसाळकर बोलत असतानाच मॉरिस मध्ये येतो आणि आज बहोत लोग सरप्राइज होंगे, असं म्हणतो. काही गोष्टी एकतेसाठी, चांगले काम करण्यासाठी होतात, असे बोलून पुन्हा घोसाळकरांना दोन शब्द बोलण्याचा आग्रह करतो. घोसाळकर यांनी बोलताना, एक चांगली दिशा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. साडी, रेशन वाटण्यासोबतच मुंबई ते नाशिक बस प्रवास सुरू करणार आहोत. नवीन संकल्प घेत एकत्र काम करणार आहोत. आमच्यात, कार्यकर्त्यांमध्ये काही गैरसमज होते. मात्र आता एकत्र येत काम करणार असे ते अभिषेक म्हणाले. बोलणे झाल्यानंतर उठून जात असतानाच त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या गेल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Dahisar Firing : महाराष्ट्रात गुंडांचे राज्य, फडणवीस राजीनामा द्या; संजय राऊतांची थेट मागणी

फेसबुक लाइव्हनंतर घोसाळकर उठून हसतच बाहेर येत असतानाच त्यांच्यावर एका पाठोपाठ एक पाच गोळ्या झाडल्याचे फेसबुक लाइव्हमध्ये दिसते. त्यातील तीन गोळ्या अभिषेक यांना वर्मी लागल्या. तर एक अगदी जवळून त्यांच्या डोक्याला लागल्याचे समजते. अभिषेक यांना तातडीने करुणा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, अतिरक्तस्रावाने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या गोळ्या मॉरिसने झाडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिल्याचे समजते.

चिडलेल्या शिवसैनिकांनी केली ताेडफाेड

चिडलेल्या शिवसैनिकांनी मॉरिसच्या कार्यालयाची तोडफोड केली. हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय आहे. मॉरिसने कोरोना काळात अनेकांना मदत केली होती. मात्र, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची होती. या गोळीबाराबाबत कळल्यानंतर सहआयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त राजीव जैन यांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -