घरक्राइमAbhishek Ghosalkar : घोसाळकरांना मुलाखतीसाठी कसे नेले; नेमके काय झाले? प्रत्यक्षदर्शीने महिलेने...

Abhishek Ghosalkar : घोसाळकरांना मुलाखतीसाठी कसे नेले; नेमके काय झाले? प्रत्यक्षदर्शीने महिलेने सांगितला घटनाक्रम

Subscribe

मुंबई : उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात भाजपा आमदाराने केलेल्या गोळीबारीची घटना ताजी असतानाच दहिसरमध्ये ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून केला आहे. या घटनेतील आरोपी मॉरिस याने अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हवर संवाद घेतल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडले. या गोळीबारीत अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती एक प्रत्यक्षदर्शी महिलेने झी 24 तासशी बोलताना सांगितला घटनाक्रम दिली आहे.

प्रत्यक्षदर्शी महिला म्हणाली, “आम्हाला दुपारी 3 वाजता फोन आला की, सर्व महिलांनी शिवसेनेच्या गणपत पाटील नगर येथील कार्यालयात या.आम्हाला बोलविले होते, पण का बोलविले होते, त्याबद्दल आम्हाला माहिती नव्हते. यानंतर आम्हाला आयसी कॉलनीच्या शाखेत बोलावले गेले, तिथेही आम्ही दीड तास बसलो होतो. त्या ठिकाणी केल्यानंतर कळाले की, मॉरिस महिलांना साड्या देणार आहे. पण तिथे दोन मिनिटांसाठी अचानक लाईट्स गेली. तेव्हा आम्ही महिला शाखेत बसून होतो आणि भाई हा शाखेच्या बाहेर उभा होता. तेव्हा मॉरिसने सांगितले, की सगळ्या महिलांना साड्या द्याच्या आहेत, त्यांना आत बोलवा”

- Advertisement -

हेही वाचा – Dahisar Firing : गोळीबारात अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, गोळीबारानंतर हल्लेखोर मॉरिसची आत्महत्या

प्रत्यक्षदर्शी महिलने सांगितले की, “अभिषेक घोसाळकर यांना मॉरिसने त्यांच्या कार्यालयात बोलावले. शिवसेनेची शाखा आणि मॉरिसचे कार्यालय हे जवळच आहे. पण ते पुन्हा शाखेत आले. तेव्हा मॉरिस म्हटले की, मला तुमची मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी कार्यालयात या. यानंतर अभिषेक घोसाळकर त्यांच्यासोबत प्रवीण नावाच कार्यकर्ता देखली गेला होता आणि थोड्यावेळाने प्रवणी बाहेर आला आणि भाईला (घोसाळकर) गोळी मारली, असे ओरत लागला. घोसाळकरांना गोळी मारल्याचे कळताच आम्ही सर्व बायका पळत कार्यालयाच्या दिशेन धाव घेतली. तेव्हा प्रवीणने घोसाळकरांना धरून बाहेर आणले आणि त्यांना रिक्षापर्यंत आणले. पण एकही रिक्षा चालका रुग्णालयात जाण्यास तयार नव्हता. एक रिक्षा चालकाला आम्ही तयार केला आणि रिक्षातून भाई (घोसाळकर) रुग्णालयात नेले. आधी त्यांना रुग्णालयात न्या मग मारेकऱ्यांचा शोध असे मी त्यांना म्हणत होते. त्यावेळी मॉरिस कुठे पळाला हेच कोणाला कळले नाही. कारण त्या रस्त्यावर अंधार असल्यामुळे काही दिसत नव्हते.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -