घरदेश-विदेशटीसीएसच्या अडीच लाख कर्मचार्‍यांचे कायम वर्क फ्रॉम होम!

टीसीएसच्या अडीच लाख कर्मचार्‍यांचे कायम वर्क फ्रॉम होम!

Subscribe

- कर्मचार्‍यांची पसंती, कंपनीच्या खर्चात बचत

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर कर्मचार्‍यांना कार्यालयात जाणे शक्य होत नसल्यामुळे काही कंपन्यांनी कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करायला सांगितले आहे. ऑफिस, बॅण्डविड्थ, इतर व्यवस्था यांचा खर्च वाचल्यामुळे अनेक कंपन्यांसाठी वर्क फ्रॉम होम फायदेशीर ठरत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील टाटा इंडस्ट्रीजमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 3 मे किंवा त्यानंतरदेखील लॉकडाऊन सुरू राहू शकतो. मात्र, लॉकडाऊननंतर देखील तब्बल अडीच लाखांहून जास्त कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’च करण्याचा निर्णय टीसीएसने घेतला आहे, असे वृत्त ट्रॅक डॉट इनच्या हवाल्याने देण्यात आले आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून म्हणजेच गेल्या जवळपास महिन्याभराहून अधिक काळापासून वर्क फ्रॉम होम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर टीसीएसने अशाच प्रकारचा निर्णय घेतला होता. आता मात्र, लॉकडाऊननंतर अडीच लाखांहून जास्त कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. सध्या टीसीएसमध्ये सुमारे 3 लाख 55 हजार कर्मचारी काम करत आहेत.

- Advertisement -

यापैकी 75 ते 80 टक्के कर्मचारी कायमस्वरूपी घरूनच काम करणार असून 20 टक्केे कर्मचारी प्रत्यक्ष ऑफिसमध्ये येऊन काम करणार आहेत. याला टीसीएसकडून ‘मॉडेल 25’ असे नाव देण्यात आले आहे. सध्या तरी 2025 पर्यंत हे मॉडेल राबवणार असल्याचे समजते. सध्याच्या परिस्थितीमध्ये आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत घटले आहेत. मात्र, त्यावर कर्मचार्‍यांना कामावरून कमी करणे हा उपाय होऊ शकत नाही. त्यामुळे त्यावर मार्ग काढण्यासाठीच मॉडेल 25 आणण्यात आल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वर्क फ्रॉम होम हा पर्याय अनेक कंपन्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. खर्च वाचल्यामुळे कंपनीच्या आर्थिक परिस्थितीला बळ देणारा हा निर्णय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या, विशेषत: आयटी क्षेत्रातल्या कंपन्या कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमचाच पर्याय देण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -