घरदेश-विदेशसाडेसहा लाख कर्मचार्‍यांनी पीएफमधून पैसे काढले

साडेसहा लाख कर्मचार्‍यांनी पीएफमधून पैसे काढले

Subscribe

लॉकडाऊनमुळे उत्पन्न झाले बंद

करोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जारी करण्यात आल्यानंतर कंपन्यांमधील काम बंद असल्यामुळे लोकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे 6 लाख 50 हजाराहून अधिक कर्मचार्‍यांनी खर्चाची तोंड मिळवणी करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधून (ईपीएफ) पैसे काढले आहेत. लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, एप्रिल महिन्यात दररोज सरासरी 30 हजार ते 35 हजार लोकांनी त्यांच्या ईपीएफमधून पैसे काढले आहेत. यामुळे लोक किती आर्थिक संकटात सापडले आहेत, हे दिसून येत आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) आकडेवारीनुसार, करोना लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत ईपीएफमधून 2 हजार 700 कोटी काढले गेले आहेत.

- Advertisement -

एका सरकारी अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, यामध्ये ईपीएफओ अंतर्गत सेवानिवृत्त निधीमधून थेट काढलेला पैसा आणि कंपनीच्या पीएफ ट्रस्टद्वारे व्यवस्थापित केलेल्या पैशांचा समावेश आहे. पैसा काढण्यात फक्त छोट्या कंपन्यातील कर्मचारी आघाडीवर नाहीत तर मोठ्या कंपन्यातील कर्मचारी देखील आहेत.

उदाहरणार्थ, कुद्दलोरेमधील नेवेली लिग्राइट कॉर्पोरेसनमधील कर्मचार्‍यांनी 84.4 कोटी रुपये, विजागमधील विशाखापट्टणम स्टील प्लांटमधील कर्मचार्‍यांनी 40.9 कोटी आणि एनटीपीसी लिमिटेडच्या कर्मचार्‍यांनी 28 कोटी ईपीएफमधून काढले.

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे लोकांचे उत्त्पन्नाचे स्त्रोत थंडावले आहेत. आम्ही विचारदेखील केला नव्हता की, इतके लोक नवीन नियमांनुसार पैसे काढतील. लोकांचा पैसे काढण्याचा हा कल फक्त एक राज्य किंवा काही औद्योगिक ठिकाणी मर्यादित नाही. सर्व राज्य आणि क्षेत्रांमध्ये हेच सुरू आहे. अहवालानुसार येत्या 10 दिवसांत किमान 10 लाख लोक ईपीएफमधून पैसे काढतील, असे दिसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -