घरमहाराष्ट्रपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त..., भाजपा आणि शिवसेनेच्या जाहिरातबाजीवर काँग्रेसची टीका

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…, भाजपा आणि शिवसेनेच्या जाहिरातबाजीवर काँग्रेसची टीका

Subscribe

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्याच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपा आणि शिवसेनेकडून जोरदार जाहिरातबाजी होत आहे. दोघांकडूनही दावे केले जात आहेत, त्यावरून काँग्रेसने ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…’ अशी टिप्पणी करत टीका केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व…. अंमलबजावणी वेगवान, अशी कॅप्शन देत, शिवसेनेच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्याने शिंदे सरकारने गेल्या वर्षभरात घेतलेल्या निर्णयाची जंत्री या दिली आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. त्यातही ‘पुन्हा येणार… शिंदे सरकार’ असा दावाही करण्यात आला आहे. त्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत, ‘शिंदे सरकार?’ असा सवाल उपस्थित करत पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त… अशी टिप्पणी केली आहे.

- Advertisement -

तर, महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग शेजारच्या गुजरात तसेच भाजपशासित राज्यात जात असल्याची ओरड होत असताना बुधवारी झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. हे प्रकल्प पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नंदुरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई या भागांत होणार असून यामुळे सुमारे 1 लाख 20 हजार रोजगारनिर्मिती होणार आहे.

‘प्रगतीमान सरकारचा गतीमान निर्णय’ अशी कॅप्शन देत, भाजपाने या निर्णयाची ट्विटरवरून जाहिरात केली आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो वापरत ‘देवाभाऊ सुपरफास्ट..’ असे कौतुक केले आहे. हाच धागा पकडून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे. देवा भाऊ सुपरफास्ट? शिंदे कुठे गेले? ते सुपर स्लो का? असे खोचक सवाल सचिन सावंत यांनी केले आहेत. शिवाय, पिक्चर इधर भी बाकी है मेरे दोस्त… असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -