घरमहाराष्ट्रPM Modi Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिक, मुंबई दौऱ्यावर; शिवडी-न्हावा...

PM Modi Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिक, मुंबई दौऱ्यावर; शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूचे उदघाटन

Subscribe

नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी (12 जानेवारी) दुपारी 12.15 वाजता नाशिक येथे आगमन होईल. नाशिकमध्ये 27 व्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय मोदी हे नाशिकमधील प्रसिद्ध काळाराम मंदिराला भेट देणार आहेत.

मुंबई : नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेला 27 वा युवा राष्ट्रीय महोत्सव तसेच मुंबई तसेच महानगर परिसरातील 30 हजार 500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उदघाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (12) नाशिक आणि मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने नवी मुंबईत नमो महिला सशक्तीकरण अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून मोदी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकराची उपलब्धी मांडण्याची शक्यता आहे. त्यांच्या दौऱ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. (PM Modi Tour Prime Minister Narendra Modi on Friday visit to Nashik Mumbai Inauguration of Shivdi Nhava Sheva Sea Bridge)

नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी (12 जानेवारी) दुपारी 12.15 वाजता नाशिक येथे आगमन होईल. नाशिकमध्ये 27 व्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय मोदी हे नाशिकमधील प्रसिद्ध काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी तीन वाजता मोदी यांचे मुंबईत नौदलाच्या आयएनएस शिक्रावर आगमन होईल. दुपारी साडेतीन वाजता मोदी यांच्या हस्ते अटलबिहारी वाजपेयी शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूचे अर्थात एमटीएचएलचे उद्घाटन होईल. उदघाटनानंतर मोदींचा ताफा शिवडी- न्हावाशेवा सेतूवरून प्रवास करून नवी मुंबईत पोहचेल.

- Advertisement -

हेही वाचा : Thackeray Group : उद्धव ठाकरे गटात धुसफूस सुरू; योग्य जबाबदारी पार पाडली नसल्याचा ठपका

नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी हे मुंबईतील पूर्व मुक्त मार्गाला जोडणाऱ्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या भूमिगत बोगद्याचे भूमिपूजन करतील. रत्ने आणि आभूषण क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, पंतप्रधान सिप्झ सेझ येथे ‘भारतरत्नम’ आणि नवीन उपक्रम व सेवा टॉवर 01 चे करणार उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल. तसेच बेलापूर मेट्रोचे औपचारिक उदघाटन, पालघर आणि ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मोदी लोकार्पण करतील.

- Advertisement -

हेही वाचा : RashtraMata Jijau Janmotsav : जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला उजळले ‘मातृतीर्थ’

तसेच उरण -खारकोपर रेल्वे मार्गाचे उदघाटन करून मोदी हे उरण रेल्वे स्थानक ते खारकोपर या दरम्यान धावणाऱ्या ईएमयू रेल्वेगाडीला हिरवी झेंडा दाखवतील. तसेच ठाणे-वाशी/पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा गाव या नवीन उपनगरीय स्थानकाचे लोकार्पण मोदींच्या हस्ते केले जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता मोदी हे मुंबई विमानतळावरून नवी दिल्लीच्या दिशेने रवाना होतील. मोदींच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -