घरठाणेअखेर दिघा गाव रेल्वे स्थानक सुरू होणार

अखेर दिघा गाव रेल्वे स्थानक सुरू होणार

Subscribe

खासदार राजन विचारे यांनी केलेल्या संघर्षाला यश

ठाणे । गेल्या आठ महिन्यापासून तयार झालेले दिघागाव रेल्वे स्थानक व्हीआयपींच्या प्रतीक्षेत रखडले होते. हे स्थानक सुरू व्हावे यासाठी शिवसेना नेते, ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री तसेच रेल्वे प्रशासन यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु याची दखल घेतली जात नव्हती. खासदार राजन विचारे यांनी या दिघा गाव रेल्वे स्थानकात स्वाक्षरी मोहीम घेऊन दहा हजार नागरिकांच्या सह्या घेतलेली कागदपत्रे, नागरिकांच्या प्रतिक्रिया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री यांना दिले. नुकतेच युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही या स्थानकाला भेट दिली. तयार झालेले दिघागाव रेल्वे स्थानक का सुरू करीत नाही, असा जाब सरकारला विचारला होता.
12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाच्या उद्घाटनला येणार होते. परंतु त्यामध्ये दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्याचे निश्चित नव्हते. परंतु ते आता निश्चित झाले असून नुकताच खासदार राजन विचारे यांना रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांचे तसे पत्र प्राप्त झाले आहे.

दिघा रेल्वे स्टेशनमुळे त्रास वाचणार
नवी मुंबई शहरात नोकरीनिमित्त कल्याण, डोंबिवली ,अंबरनाथ, बदलापूर येथील नागरिक येत असतात. या रेल्वे प्रवाशांना नवी मुंबईत येण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात येऊन हार्बर मार्गावरील वाशी लोकल पकडावी लागते. या प्रवाशांना थेट नवी मुंबईमध्ये प्रवेश मिळण्यासाठी हा ऐरोली कळवा एलिव्हेटेड प्रकल्प महत्त्वाच ठरणार आहे. तसेच यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा भार ही कमी होणार आहे. त्यामुळे ठाण्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल.

- Advertisement -

दिघा स्टेशनवरील सुविधा
फलाटांचे क्रमांक एक, दोन, तीन, चार
फलाटाची लांबी 270 व रुंदी 12 मीटर
भुयारी मार्ग ५
सरकते जिने 6
लिफ्ट 2
दोन्ही बाजूस पार्किंग व्यवस्था
दोन्ही बाजुंना सहा सहा तिकीट खिडक्या
शौचालये २
पिण्याच्या पाण्यासाठी 2 वॉटर कुलर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -